सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे वाभाडे काढणारे 'यह परळी का कानून है, या व्हिडिओ गीताचा परळीत धुमाकूळ
काँग्रेस,वंचितांच्या या प्रचार व्हिडिओला पाहिले
एक लाख लोकांनी
परळी प्रतिनिधी. परळी नगरपरिषदेत सत्ताधारी राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्ट आणि आणि अनागोंदी कारभाराचे वाभाडे काढणाऱ्या यह परळी का कानून है, गंधा कानून है या व्हिडिओने शहरात धुमाकूळ घातला असून काँग्रेस ,वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या या प्रचार गीताला एक लाख लोकांपेक्षा अधिक नागरिकांनी पाहिले आहे. या गीताने नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस ,वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने मतदारांचा कौल झुकल्याचे दिसत आहे.
परळी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 रणधुमाळी सुरू असून काँग्रेस, माकप, वंचित बहुजन आघाडीने प्रचारात आघाडी घेतली आहे.नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मैनुमा बेगम सय्यद हनीफ उर्फ बहादूर भाई तसेच वंचित बहुजन आघाडी,व कांग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार यांच्या प्रचारार्थ यह गंधा कानून है,यह परळी का कानून है हे ऑडिओ व व्हिडिओ गीत चौका चौकातून एलईडी स्क्रीनवर दाखविण्यात येत आहे. मतदार रस्त्यावर उभे राहून या संपूर्ण गीताचा आस्वाद घेत आहेत.
या गीताच्या माध्यमातून परळीतील अस्वच्छता ,अर्धवट कामे ,खराब अवस्थेतील नाल्या ,गटारी, रस्ते ,नगरपालिकेतील भ्रष्टाचार आदीवर उत्कृष्ट चित्रण केले गेले आहे. महानायक अमिताभ बच्चन व सुपरस्टार रजनीकांत यांचा प्रचंड गाजलेला चित्रपट अंधा कानून या चित्रपटातील गीताचा आधार घेऊन हे विडंबनात्मक व नगरपालिकेत सत्ताधारी राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वाभाडे काढणारे गीत शहरातील सुमारे एक लाख लोकांपेक्षा अधिक नागरिकांनी आणि मतदारांनी पाहिले आहे. या गीतामुळे निवडणुकीचे वातावरण काँग्रेसमय झाल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा