भन्ते आचलानंद महाबोधी महाविहार बुद्धगया येथील आंतरराष्ट्रीय त्रिपीटीका संमेलनास रवाना


भन्ते आचलानंद महाबोधी महाविहार बुद्धगया येथील आंतरराष्ट्रीय त्रिपीटीका संमेलनास रवाना 


परळी वैजनाथ.     महाबोधी महाविहार बौद्ध गया येथे होणा-या आंतरराष्ट्रीय त्रिपीटीका संमेलनास मराठवाड्यातील भन्ते आचलानंद हे उपस्थित राहणार आहेत. त्रिपीटीक हा बौद्ध धर्मांतील महत्त्वाचा ग्रंथ आहे. जगातील सर्व बौद्ध राष्ट्रात या ग्रंथानुसार आचरण केले जाते.

    बिहार राज्यातील बौद्ध गया येथे 20 वे आंतरराष्ट्रीय त्रिपीटीका संमेलन 2 डिसेंबर ते 12 पर्यंत आयोजित करण्यात आले आहे.या संमेलनात 30 देशांची उपस्थिती असणार आहे.या संमेलनाचे नेतृत्व भारताकडे आले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून महाबोधी महाविहार बुद्धगया मुक्ती आंदोलन सुरू आहे.परंतू बिहार राज्य सरकार आणि केंद्र सरकार या विहिराला ब्राह्मणांच्या तावडीतून सोडवून बौद्धांच्या ताब्यात देण्यास टाळाटाळ करीत आहेत.त्यामुळे आता हे आंदोलन देशभर पेटले आहे.यातच आता 2 डिसेंबर पासून आंतरराष्ट्रीय त्रिपीटीका संमेलन सुरू होणार आहे.
   या संमेलनास भन्ते आचलानंद रवाना झाले आहेत.तसेच त्यानंतर ते महाबोधी महाविहार बुद्धगया मुक्ती आंदोलनात सहभागी होणार आहेत

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने