आजारी असतानाही बहादूर भाई रणांगणात विरोधकांच्या अफवांवर परळीकरांनो विश्वास ठेवू नका
पाल्यांच्या भविष्यासाठी कांग्रेस वंचित बहुजन आघाडीलाच विजयी करा - बहादूर भाई
परळी प्रतिनिधी. मागील दोन-तीन दिवसापासून आजारी असल्याने शहरातील माझ्या मतदार बंधूंना भेटू शकलो नाही. याची खंत आहे. माझ्या आजारपणाचा विरोधकांनी अपप्रचार केला. या अपप्रचाराला बळी न पडता परळीकरांनो पाल्यांच्या भविष्यासाठी काँग्रेस वंचित बहुजन आघाडीलाच प्रचंड मताने 2 डिसेंबर रोजी मतदान करून विजयी करावे असे आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुर भाई यांनी आज दिनांक 30 रोजी सायंकाळी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुर भाई म्हणाले की,आजारी असल्याने प्रचारात विश्रांती घेतली.किडनीवर परिणाम झाला पण थांबलो नाही.प्रत्यक्ष परळीच्या जनतेशी भेटू शकलो नाही. तरीही प्रचार कोठेही थांबला नाही. आणि थांबणारही नाही याचा विरोधकांनी विचार करावा आणि अपप्रचार थांबवावा.आजारी असल्याने दोन दिवस दिसलो नाही याचा काही जणांनी गैरसमज निर्माण केला.पण तसे नाही सर्व ताकद लावून लढत आहोत.आमचा प्रचार आपल्या माध्यमातून सुरू आहे.
परळीकरांना विनंती आपल्या पाल्याच्या विकासासाठी, भविष्यासाठी, येणाऱ्या पर्यटकांची, पाहुणे, शिक्षणासाठी येणारांना चांगली परळी दाखवायची असेल, घरोघरी तसेच परळीची स्वच्छता,ट्रफीक,पाणी, वीज,परळीकरांना उपलब्ध करून देण्यासाठी लढत आहोत. आमच्याकडे सत्ताधाऱ्याकडे असणारी धनशक्ती नाही परंतु परळीकरांसाठी लढण्याची शक्ती नक्कीच आहे. त्यामुळे येत्या 2 डिसेंबर रोजी तमाम परळीकरांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मैनुमा बेगम सय्यद हनीफ तसेच नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार पंजा आणि कपबशी या चिन्हाचे बटन दाबून प्रचंड मताने विजय करावे.
या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, कांग्रेस कार्यकारिणी सदस्य एडव्होकेट अनिल मुंडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव एडवोकेट संजय रोडे, प्रसेंजित रोडे, उमेदवार विश्वनाथ गायकवाड, उमेदवार बदरभाई, रणजित देशमुख,एतेशाम खतीब, शशी चौधरी,दिपक सिरसाठ, वैजनाथ गडेकर आदी उपस्थित होते.
खासदार बजरंग सोनवणे यांना घेराव काही युवकांनी नेहरू चौक तळ येथे घातला होता. या घटनेचा मी निषेध करतो. मराठा आरक्षणासाठी मुस्लिम समाजाने नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. तसेच ओबीसी समाजाच्या आंदोलनात ही सहभाग नोंदवला आहे. मराठा बांधव व ओबीसी ही आमचेच आहेत. असेही बहादुर भाई यावेळी म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा