परळीची वाट लावण्यात माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख व बाजीराव धर्माधिकारी यांचाच वाटा- बहादुरभाईविकासाच्या नावाखाली परळीला कुठवर वेड्यात काढणार - मिलिंद घाडगे

परळीची वाट लावण्यात माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख व बाजीराव धर्माधिकारी यांचाच  वाटा- बहादुरभाई

विकासाच्या नावाखाली परळीला कुठवर वेड्यात काढणार - मिलिंद घाडगे 

परळी प्रतिनिधी.       परळीची वाट  लावण्यात माजी  नगराध्यक्ष  दीपक देशमुख तसेच बाजीराव  धर्माधिकारी यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे ते कोणत्या तोंडाने परळी नगर परिषदेच्या निवडणुकीत मते मागत आहेत. परळीतील जनतेला स्वच्छ पाणी स्वच्छता रस्ते व  वीज  देण्यासाठी काँग्रेस वंचित बहुजन आघाडीलाच 2 डिसेंबर रोजी प्रचंड मतदान करून विजयी करा असे आवाहान काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुर भाई यांनी केले.तर विकासाच्या नावाखाली परळीला कुठवर वेड्यात काढणार असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांनी सत्ताधारी महायुतीला केला आहे. काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी च्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मैनुमा बेगम सय्यद हनीफ उर्फ बहादूर भाई तसेच प्रभाग क्रमांक 8 मधील काँग्रेसचे उमेदवार लक्ष्मीबाई विश्वनाथ गायकवाड व बबलू सादिक भाई यांच्या प्रचारात भव्य कॉर्नर सभा संपन्न झाली.
    परळी नगर परिषद निवडणुकीतील काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मैनुमा बेगम सय्यद हनीफ उर्फ बहादूर भाई, प्रभाग क्रमांक  8 च्या उमेदवार लक्ष्मीबाई विश्वनाथ गायकवाड, तसेच बबलू भाई यांच्या प्रचारात काल दिनांक 26 रोजी रात्री आठ वाजता भिमवाडी येथे काँग्रेस वंचित बहुजन आघाडीची भव्य कॉर्नर सभा संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी  काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अडवोकेट प्रकाश मुंडे होते तर या सभेला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मैनुमा बेगम सय्यद हनीफ उर्फ बहादूर भाई, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे ,जिल्हा सचिव अडवोकेट संजय रोडे ,काँग्रेसचे  शशी चौधरी, एतेशाम खतीब, वैजनाथ गडेकर , ज्ञानेश्वर गीते, धम्मा शिरसागर आधी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 
    यावेळी पुढे बोलताना काँग्रेस शहराध्यक्ष बहादूर भाई म्हणाले की परळी शहराची जी बकाल अवस्था झाली आहे रिकामे अर्धवट राहिले आहेत ते सर्व कामे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख तसेच बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्याच काळात झालेली आहेत. दीपक देशमुख हे धनंजय मुंडे यांच्या सोबतच होते आता निवडणूक तोंडावर आली की त्यांनीच त्यांना निवडणुकीत उभे केलेले आहे अशा सुपारी बाज लोकांना परळीकरांनी मतदान करू नये. परळी नगर परिषदेत काँग्रेस वंचित बहुजन आघाडीची सत्ता आली तर परळीतील जनतेला प्रत्येक वार्डात आरोग्याची सुविधा निर्माण व्हावी यासाठी  स्वतंत्र मोहल्ला किल्लनीक  सुरू करुत. तसेच परळीतील जनतेला स्वच्छ पाणी शहरातील स्वच्छता तसेच चांगले रस्ते नाल्या आणि वीज देऊन विकास करूत.
   परळीच्या प्रश्नावर लढत असताना आम्हाला सत्ताधाऱ्यांनी जेलमध्ये टाकले तरी आम्ही डगमगलो नाहीत. भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त परळीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला मतदान रुपी आशीर्वाद द्या असेही ते म्हणाले. तर गेली 25 वर्ष झाले शादीखान्याचे काम झाले नाही भिम वाडीचे बुद्ध विहार आहे अपूर्णच आहे मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी बांधलेले वस्तीगृह अजुनही सुरू झालेले नाही. त्यामुळे मुंडे बहीण भाऊ परळीचा विकासासाठी पुन्हा आम्हाला संधी द्या असे म्हणत आहेत परळीच्या जनतेला असे म्हणून आता वेड्यात काढणे बंद करा परळीची  जनता आता तुम्हाला मतदान करणार नाही ते काँग्रेस वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करणार आणि नगरपालिकेत काँग्रेसचा नगराध्यक्ष होईल असे मिलिंद घाडगे यांनी सांगितले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष एडवोकेट प्रकाश मुंडे यांनी उपस्थित आमचे आभार मानले व काँग्रेस वंचित बहुजन आघाडीलाच विजयी करण्याचे आवाहन केले.
   या सभेला काँग्रेस ,वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते ,महिला ,पुरुष ,मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने