आंबेडकरी समाजाच्या निणार्यक बैठकीत घड्याळाला मतदान करू नका असा ठराव
बीड प्रतिनिधी. बीड येथे काल तमाम आंबेडकरी समाजाच्या नेत्यांची एक महत्वपूर्ण निणार्यक बैठक झाली व या बैठकीत बीड नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आंबेडकरी समाजाने घड्याळाला मतदान करू नका असा ठराव घेतला.
आजच्या आंबेडकरी समाजाच्या निर्णायक बैठकीत सन्माननीय पप्पू भैय्या कागदे, सन्माननीय अजिंक्य चांदणे, दिनकर बोराडे, विधीज्ञ भगवान कांडेकर, प्रा. वसंत ओगले, विधीज्ञ राहूल मस्के, बबनराव वडमारे, अरूण सवई, सत्यनारायण ढाका, गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी बीड नगरपरिषद निवडणूकीत नगराध्यक्ष पदाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. स्मिता विष्णु वाघमारे यांना मतदान रुपी आशीर्वाद देऊन भीमकन्येला नगराध्यक्ष करण्याचा निर्णय तसेच सर्व प्रभागातील नगरसेवक पदाच्या उमेदवारांना पाठिंबा देऊन निवडून आणण्याचा निर्णय घेण्यात आला.
. या निर्णयाचा बीड जिल्ह्यातील इतर नगर परिषद निवडणुकीत परिणाम होतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा