परळी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकीत कांग्रेस व वंचित बहुजन आघाडी आली एकत्र उद्या प्रचाराचा फुटणार नारळ

परळी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकीत कांग्रेस व वंचित बहुजन आघाडी आली एकत्र 

उद्या प्रचाराचा फुटणार नारळ 



परळी प्रतिनिधी         महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय कांग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी घेतला आहे.त्यानुसार 2 डिसेंबर रोजी होणारी परळी नगर परिषद निवडणुक संयुक्त एकत्रित लढविण्याचा निर्णय घेत असल्याचे शहराध्यक्ष बहादुर भाई व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.उद्या आघाडीचे सर्व उमेदवारांच्या उपस्थित प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे.
   परळी नगर परिषदेचा भोंगळ कारभार, येथील अनागोंदी कारभार रोखण्यासाठी व परळी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी कांग्रेस व वंचित बहुजन आघाडी आमची संयुक्त आघाडी आम्ही उभी केली आहे.आमचे काही उमेदवार फोडण्याचे काम भाजपा व सत्ताधारी पक्षाने केले आहे.छाननीच्या वेळी झालेला हा गोंधळ जाणीवपूर्वक केल्याचे दिसते.वास्तवीक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कारवाई करायला हवी होती.परळीकरांसाठी आघाडी.उमेदवारी अर्ज निवडणूक विभागाने आँनलाईन अपलोड केले नसल्याने आम्हाला आक्षेप घेता आले नाही.असे कांग्रेस शहराध्यक्ष बहादुर भाई यांनी सांगितले.
    नगराध्यक्ष पद कांग्रेसकडे तर उपनगराध्यक्ष पदी वंचित बहुजन आघाडीचा राहील. यामध्ये कांग्रेसचे 15 तर वंचितचे 6 असे मिळून एकूण 23 जागा आघाडी लढविणार आहे.परळी नगर परिषदेत भ्रष्टाचार करुन परळीला सत्ताधारी पक्षाने भकास केले आहे.त्यामूळे भ्रष्टाचार मुक्त परळी करण्यासाठी आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार परळीत आम्ही कांग्रेस सोबत आहोत असे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांनी सांगितले.परळीची जनता निश्चितच कांग्रेस व वंचित बहुजन आघाडीला विजयी करेल असा आशावाद व्यक्त केला.

   या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मुंडे, कांग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते प्रकाश देशमुख,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष एडव्होकेट प्रकाश मुंडे, वंचित बहुजन आघाडीचे एडव्होकेट संजय रोडे, बालासाहेब जगतकर,वंचिचे तालुका अध्यक्ष गौतम साळवे यांच्या सह कांग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक पदाचे  सर्व उमेदवार पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने