सत्ताधारी पक्षाने कापले तिकीट
अनेकांनी धरली वेगळी वाट
परळी प्रतिनिधी. परळी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत परळी नगर परिषदेवर सत्ताधारी असणा-या विद्यमान पक्षाकडून अनेक नगरसेवकांची तिकीटे कापली गेली आहेत.अशा नाराज असलेल्या अनेकांनी वेगळी वाट धरत स्वतंत्र अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचे ठरवल्याने हे कोणाच्या पथ्यावर पडते हे महत्त्वाचे ठरणार आहे.
परळी नगर परिषदेत विद्यमान नगरसेवक असणारे बहुतांश नगरसेवकांना यावर्षी पुन्हा पक्षाने संधी दिली नाही.अनेक वार्डातून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट,भाजपा व रिपाई युतीकडून नव्या चेह-यांना संधी दिली आहे.तर जे कार्यकर्ते गेली अनेक वर्षे पक्षासाठी एकनिष्ठ काम करत होते.अशांना पक्ष आपणाला संधी देईल असे वाटत होते.त्यांनही नाकारले आहे.
त्यामुळे तिकीट कापलेले माजी नगरसेवक, इच्छुक कार्यकर्ते यांचा भ्रमनिरास झाल्याने अनेकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.ही नाराजी भोवणार का? किंवा कोणताही फरक न पडता पुन्हा परळी नगर परिषदेवर सत्ताधारी आपला झेंडा रोवणार का यासाठी मात्र 3 डिसेंबरची वाट परळीकरांना पहावी लागणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा