परळीत रंगणार उद्या 7 वे मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलन
गुणवंत शिक्षकांचा पुरस्कार देऊन होणार सन्मान
परळी प्रतिनिधी. परळी वैजनाथ येथे आज दिनांक 16 नोव्हेंबर रोजी 7 वे मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.या एकदिवसीय साहित्य संमेलनात उद्घाटन ,परिसंवाद, कथाकथन आणि मान्यवर कवींचे कवी संमेलन रंगणार आहे. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गुणवंत शिक्षकांचा शिक्षक गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
परळी वैजनाथ येथील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात आज रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी शिक्षण मार्ग च्या वतीने 7 वे एक दिवसीय मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी आणि विडंबनकार प्रभाकर साळेगावकर यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध विचारवंत व साहित्यिक अजयकुमार गंडले हे आहेत तर स्वागताध्यक्ष पदी नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे हे आहेत.
उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा शिक्षण संघटनेचे नेते पी. एस. घाडगे, माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, परळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी, काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुरभाई, कै . लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय देशमुख, वैद्यनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जगदीश जगतकर,माजी संमेलनाध्यक्ष ए .तु.कराड, माजी उपनगराध्यक्ष अयुब खान पठाण, सामाजिक कार्यकर्ते अनंत इंगळे, सामाजिक कार्यकर्ते उत्तम माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन कवी सिद्धेश्वर इंगोले करतील तर उद्घाटक परिचय प्रा. डॉ .सिद्धार्थ तायडे आणि अध्यक्षांचा परिचय अशोक नावंदे तर आभार प्रदर्शन अनंत मुंडे करतील. याप्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येईल.तर खास शिक्षकांसाठी तयार करण्यात येणा-या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन करण्यात येईल.
दुसऱ्या सत्रात दुपारी 2 ते 3 या वेळेत प्रा. डॉ. संतोष रणखांब, सोनपेठ यांच्या अध्यक्षतेखाली नवीन शैक्षणिक धोरण व ग्रामीण शिक्षणाची गळचेपी या विषयावर होणाऱ्या परिसंवादात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. डॉ.उमाकांत राठोड, बीड येथील साहित्यिक राजकुमार कदम सहभागी होणार आहेत. सूत्रसंचालन प्रा. डॉक्टर विक्रम धन्वे तर आभार किरण आटोळकर करतील.दुपारी 3 ते 4 यादरम्यान तिसऱ्या सत्रात कथाकथन होणार आहे. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कथाकार उदगीर येथील अंबादास केदार तर सहभागी कथाकार घाटनांदुर येथील दत्त वालेकर आणि अंबाजोगाई येथील प्राध्यापक प्रशांत पाटील आपल्या कथा सादर करतील.
सायंकाळी 4 ते 5, या दरम्यान प्रा. डॉ. माधव रोडे यांच्या अध्यक्षस्थानी होणाऱ्या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी अरुण पवार तसेच बालाजी कांबळे हे करतील. कवी संमेलनात विश्वंभर वराट, गुरुजी ,नागनाथ बडे, प्रा. डॉ.मुकुंद राजपंखे ,नांदेड येथील डॉ. आदिनाथ इंगोले, परभणीचे प्रा. प्रकाश वाकळे, लक्ष्मण लाड, लातूर येथील प्रमोद जाधव, विद्याधर पांडे, प्रा. डॉ.राजकुमार यल्लावाड, प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे, बालाप्रसाद चव्हाण, माजलगाव दत्ता वालेकर, रमेश मोटे,स .तु. जाधव, दिवाकर जोशी, बा.सो. कांबळे, अनंत मुंडे, प्रा. संजय आघाव, सिद्धेश्वर इंगोले, केशव कुकडे, सुनिता कोम्मावार, गंगाधर क्षिरसागर ,मोहन राठोड, डॉ.प्रवीण काळे, लता जोशी, डॉ. देविदास तारू, नांदेड, सुभाष सवाई, नांदेड,दिपक बिडवे, अंबाजोगाई आदी मान्यवर कवी आपल्या कविता सादर करतील.
सायंकाळी 6 ते 7 च्या दरम्यान 5 व्या सत्रात ठराव वाचन व राष्ट्रगीताने संमेलनाचा समारोप होईल. या संमेलनास मराठवाड्यातील शिक्षक शिक्षिका तसेच साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य संयोजक जेष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड तसेच स्वागत समितीचे शिवाजीराव बनसोडे, नागनाथ बडे, सौदागर कांदे ,के.डी.कांदे, मुख्याध्यापक किरण आटोळकर ,प्रा. सिद्धार्थ तायडे, सिद्धेश्वर इंगोले ,दिवाकर जोशी, बालासाहेब इंगळे, विलास ताटे,बालाजी कांबळे, मुख्याध्यापक जी.बी.शेख, गणेश खाडे, प्राचार्य अतुल दुबे, लक्ष्मण वैराळ, विकास वाघमारे, विठ्ठलराव झिलमेवाड, नवनाथ दाने, विद्याधर शिरसाट ,विनायक काळे, सम्राट गायकवाड आदिंनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा