प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपाने बाहेरील उमेदवार लादल्याची मतदारांमध्ये चर्चा

प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपाने बाहेरील उमेदवार लादल्याची मतदारांमध्ये चर्चा 

परळी प्रतिनिधी.   परळी नगर परिषद निवडणुकीत भाजपाने प्रभाग क्रमांक 7 मध्ये स्थानिक वार्डातील एकनिष्ठ काम करत असलेल्या कार्यकर्त्यांना डावलून बाहेरील उमेदवार दिला आहे अशी जोरदार चर्चा मतदारांमध्ये होतांना दिसत आहे.याचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता दिसून येते आहे.
     याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील अतिशय महत्त्वाचा वार्ड म्हणून पद्मावती विभागातील प्रभाग क्रमांक 7 समजला जातो.या भागात अनेक वर्षे पक्षाचे एकनिष्ठ पणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी नगर परिषद निवडणुकीत तिकीट मागितले होते.परंतू त्यांचा कोणाचाही विचार न करता बाहेरील उमेदवार लादल्याची मतदारांमध्ये चर्चा सुरू आहे.
   मतदारांच्या या नाराजीचा कदाचित निवडणूक निकालावर परिणाम होण्याची शक्यता दिसून येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने