काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ,वंचितचे नेते अमित भुईगळ यांच्या उपस्थितीत उद्या प्रचाराचा नारळ फुटणार काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी विजयाचे रणसिंग फुंकणार

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ,वंचितचे नेते अमित भुईगळ यांच्या उपस्थितीत आज  प्रचाराचा नारळ फुटणार 

काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी  विजयाचे रणसिंग फुंकणार

परळी प्रतिनिधी.       काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसेच वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारणी सदस्य अमित भुईगळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज परळी नगरपरिषद निवडणुक प्रचाराचा नारळ फोडून भव्य शुभारंभ करण्यात येणार आहे. या प्रचार शुभारंभाच्या सभेतून काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आपल्या विजयाचे रणसिंग फुंकणार असल्याची  माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूरभाई व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांनी दिली आहे.
   याबाबत प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, परळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदांची निवडणूक लढविण्यात येत आहे. या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ आज शनिवार,दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे. शहरातील मोंढा मार्केट येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ , तसेच वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारणी सदस्य अमित भुईगळ यांच्या प्रमुख उपस्थितीत  प्रचाराचा नारळ फोडण्यात येईल. 
     या सभेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेशभाऊ कांबळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 
   या प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमास काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे तसेच नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ अंबाजोगाई मार्गे परळी आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर बस स्थानकासमोरील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात येईल.तसेच रेल्वे स्टेशन परिसरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.
  महामानवांना अभिवादन केल्यानंतर मोंढा मार्केट येथे भव्य प्रचाराचा शुभारंभ करण्यात  येणार आहे. परळी नगर परिषदेवर काँग्रेस ,वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकविण्यासाठी मतदारांनी मोठ्या संख्येने या प्रचार शुभारंभाच्या सभेस    उपस्थित राहावे असे आवाहन प्रचार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने