धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने परळीत छत्रपती संभाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्यात आला बाळराजे दादा आवारे पाटील यांच्या प्रतिष्ठानचे कार्य

 धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने परळीत छत्रपती संभाजी महाराजांचा  पुर्णाकृती पुतळा बसविण्यात आला 

 बाळराजे दादा आवारे पाटील  यांच्या प्रतिष्ठानचे कार्य 



परळी प्रतिनिधी.      येथील छत्रपती संभाजी चौकात बाळराजे दादा आवारे पाटील यांच्या धर्मवीर छत्रपती  संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान यांच्या कडून छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती  पुतळा बसविण्यात आल्याची माहिती या प्रतिष्ठानचे मराठवाडा संपर्क प्रमुख अण्णासाहेब जाधव यांनी दिली आहे. छत्रपती संभाजी चौकात हा पुतळा बसविण्यात आल्यामुळे  शहरातील नागरिकांकडून आनंद व्यक्त होत आहे.
     याबाबत अधिक माहिती अशी की,गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ईटके कॉर्नर परळी वैजनाथ येथील छत्रपती संभाजी महाराज यांचा  पुतळा बसविण्यात यावा यासाठी शंभुप्रेमी व परळीकर आतुरतेने वाट पाहत होते .परिणामी राजकारण आणि तांत्रिक अडचणी येत असल्याने ही बाब धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष बाळराजे दादा आवारे पाटील यांच्या निदर्शनास आल्याने दादांनी  परळीकरानां दिलेला शब्द पाळत सर्व मावळ्यांच्या साक्षीने व गणीमी काव्याने काल पहाटे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे पुर्णाकृती पुतळा बसविण्यात आला.
     या पुतळ्याची सर्वस्वी बाबदारी घेत आता कुठल्याही स्थितीत आता माघार नाही.छत्रपती संभाजी राजांचा हा पुतळा बसविण्यासाठी आण्णासाहेब जाधव, राम किर्दत, वशिष्ठ वानखेडे,  विशाल इंगोले यांनी परिश्रम घेतले. राजकिय फायद्यासाठी कोणी श्रेय  घेऊ नये असे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान चे मराठवाडा संपर्कप्रमुख आण्णासाहेब जाधव  व युवक जिल्हाध्यक्ष बीड राम किर्दत यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने