परळीत भीमनगर मधील बौद्ध समाजाचा आदर्श उपक्रम, शहरातून काढली भव्य धम्म रॅलीवर्षावास समारोप प्रसंगी भंन्तेंना दिले चार चाकी वाहन



परळीत भीमनगर मधील बौद्ध समाजाचा आदर्श उपक्रम, शहरातून काढली भव्य धम्म रॅली

वर्षावास समारोप प्रसंगी भंन्तेंना दिले चार चाकी वाहन  

 परळी प्रतिनिधी - परळी येथील सुगंध कुट्टी बौद्ध विहार भीमनगर, जगतकर गल्लीतील बौद्ध समाजाने एक आदर्श निर्माण करीत मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या वर्षावासाच्या समारोप प्रसंगी शहरातून भव्य धम्म काढत भन्ते धम्मसार थेरो यांना समाजाच्या वतीने एक चार चाकी वाहन धम्म प्रचारासाठी भेट देण्यात आले. याप्रसंगी शहरातून काढलेल्या भव्य दिव्य धम्म रॅलीने वातावरण बौद्धमय झाले होते.
      भीमनगर येथील सुगंधकुटी बुद्ध विहारात   तीन महिन्या पासून वर्षावास कार्यक्रम सुरू होता. त्याचा समारोप  विविध कार्यक्रम व भव्य धम्म रॅली शहरात काढून करण्यात आला असल्याची माहिती बालासाहेब जगतकर यांनी दिली. कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आले, सर्वप्रथम सामुदायिक  त्रिशरण, पंचशील ग्रहण करण्यात आल्यावर त्यानंतर  पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण भंते धम्मसर  यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यानंतर भंते व श्रामनेर संघास भोजनदान देण्यात येऊन  यानंतर  भन्ते धम्मसार थेरो यांना बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करण्यात यावा म्हणून एक चार चाकी वाहन दान विविध मान्यवरांच्या उपस्थितीत  देण्यात आले.
    त्यानंतर भंते धम्मनाग महाथेरो यांना व भंते धम्मसार थेरो यांना चिवरदान व धम्मदान करण्यात आली व माताजी आर्याजी भीमवाडी यांचाही महिलांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर परळी शहरातून बौद्ध धम्म रॅली काढण्यात आली. असून या बौद्ध धम्म रॅलीचे परळी शहरात ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून रॅलीचे स्वागत करण्यात आले. अनेक मान्यवरांनी धम्मरली मध्ये पाणी वाटप, केळी वाटप अशा विविध प्रकारे व्यवस्था केली. तसेच  गणेश पवार यांनीही येथे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या कुटुंबाने पुष्पवृष्टी करून पूजा केली. 
     राणी लक्ष्मीबाई टावर चौक येथे धम्म रॅलीचे स्वागत करण्यात आले. रॅलीमध्ये बौद्ध समाज बांधव, त्यामध्ये महिलांचा सहभाग सक्रिय दिसून आला. बौद्ध वर पुष्पवृष्टी करण्यात आली. पुढे ही धम्म रॅली  मोंढा मार्केट, एक मिनार चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा स्टेशन येथे  भंते धम्मनाग बसवकल्याण व भंते धम्मसार  यांच्या हस्ते पुष्पहार घालून  परत शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करीत  ओवर ब्रिज, सिद्धार्थनगर, भीमवाडी कॉर्नर, टॉवर मार्गे  सावता माळी मंदिर, भीम नगर व परत सुगंध कुटी बौद्ध विहार भीम नगर जगतकर गल्ली  येथे समारोप करण्यात आला. धम्म रॅलीमध्ये घोडे ,उंट मिरवणुकीमध्ये लक्ष वेधून घेत होते. सहभागी बौद्ध उपासक,उपासिका शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी झाले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने