मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गंडले यांचा सत्कार संपन्न
परळी प्रतिनिधी. नोव्हेंबर मध्ये परळी वैजनाथ येथे होणाऱ्या 7 व्या मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध विचारवंत व साहित्यिक अजयकुमार गंडले यांचा मित्र मंडळीच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला.
16 नोव्हेंबर 2025 रोजी परळी येथे साप्ताहिक शिक्षण मार्गाच्या वतीने सातवे मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे .या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक व विचारवंत अजयकुमार गंडले यांची निवड करण्यात आलेले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल 2 ऑक्टोंबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने मित्रमंडळीच्या वतीने त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्रथम अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ सावंत, ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड, वीज निर्मिती केंद्राचे वरिष्ठ अधिकारी विलास ताटे, पत्रकार भगवान साकसमुद्रे, भगवान कसबे, प्रसिद्ध कवी व निवेदक बा.सो . कांबळे,पिंटू सरवदे, वडगाव स्टेशन चे स्टेशन मास्तर मिलिंद सावंत आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा