बुध्द धम्माचे आचरण करुन धम्मक्रांतीचे चक्र गतीमान करू -- सचिन उजगरे श्रावस्ती बुद्ध विहारात ६९ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा

बुध्द धम्माचे आचरण करुन धम्मक्रांतीचे चक्र गतीमान करू -- सचिन उजगरे 

श्रावस्ती बुद्ध विहारात ६९ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा 

माजलगाव : प्रतिनिधी
    आपसातील मतभेत व इतरांचे अवगुण काढण्यापेक्षा बुद्ध  धम्माची चळवळ गतिमान करण्यासाठी बुद्ध विचारांचे  आचरण करुन धम्मकांतीचे चक्र गतीमान करूया असे मत वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष सचिन उजगरे यांनी 69 व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दि.२ ऑक्टोबर गुरुवार रोजी श्रावस्ती बौद्ध विहार केसापुरी वसाहत येथील आयोजित कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.

     यावेळी विचारपिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सदाशिव भालेराव, डॉ.श्रीराम खळगे, भगवान सातपुते,पांडुरंग जाधव,अँड.दशरथ मकसरे, रिपब्लिकन सेनेचे बीड जिल्हा अध्यक्ष विजय साळवे , वंचित बहुजन आघाडीचे अंकुश जाधव, ज्येष्ठ आंबेडकरी नेते कचरू खळगे,वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे नेते धम्मानंद साळवे, जिल्हा उपाध्यक्ष भारत तांगडे, उत्तम जोगदंड, रणजीत घनघाव, सुमंत गायकवाड, अँड.विजय मस्के,संपादक सुभाष बोराडे,पत्रकार राज गायकवाड यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदना,त्रिशरण व पंचशील ग्रहणाने झाली.विहार परिसरात सर्वांनी एकत्रितपणे "बुद्धं शरणं गच्छामि" असा घोष करून वातावरण धम्ममय केले.बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली.

       यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन उजगरे यांनी  प्रमुख पाहुण्यांनी धम्मदेशनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे घेतलेल्या ऐतिहासिक धम्मदीक्षेचा उल्लेख करत धम्मक्रांतीचा संदेश दिला.धम्मप्रवचनात समानता, बंधुता,स्वातंत्र्य,करुणा व न्याय या बौद्ध धम्माच्या तत्त्वांवर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला.गौतम घनघाव यांनी बुद्धगीतं सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत आणली. बौद्ध उपासक व उपासिकांची उपस्थिती लक्षणीय होती.सामूहिक बुद्ध वंदना पठणाने उपस्थितांनी धम्ममय ऊर्जा अनुभवली.धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त श्रावस्ती बुद्ध विहार परिसर फुलांच्या तोरणांनी,बुद्ध ध्वजांनी व प्रकाशयोजनेने सजविण्यात आला होता.वातावरणात नमो बुद्धाय,जय भीमचा घोष घुमत होता.
यावेळी सदधम्म सेवा संघाचे सदस्य , मळीबा चांदमारे, नवनाथ शिनगारे, रविकांत उघडे , विजय होळीकट्टी, विकास डोंगरदिवे,धम्मपाल जावळे, विकास डोंगरदिवे तर, राजकुमार सोनवणे ,दिलीप मकसरे ,भीमराव कांबळे, संघर्षकुमार ओवे,सुमेध जाधव,  वंदनाताई भालेराव,  किरणताई ढाकरगे,शोभाताई मकसरे, सुभाष चंदनशिव, वंदनाताई शिनगारे ,आशाताई शिरसट, छायाताई वाघमारे, सविताताई जाधव, दीक्षा मस्के, अलकाताई घनघाव, पद्मिनी मस्के , वृंदावनी मस्के , अनिताताई गायकवाड, पुष्पाताई रणदिवे, आदी मान्यवर उपस्थित होते.
शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष पांडुरंग जाधव यांनी केले. शरणत्य घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने