धनगर समाजाला एस.टी. मधून आरक्षण मिळावे यासाठी परळीत रस्ता रोको संपन्न
परळी प्रतिनिधी. महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमाती( एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी तसेच दीपक भाऊ बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धनगर समाजाच्या वतीने परळीत आज दिनांक 1 ऑक्टोबर रोजी भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शहरातील इतके कॉर्नर येथे सकाळी 11 वाजता या रस्ता रोको आंदोलनास सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित समाज बांधवांनी विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. तसेच याप्रसंगी सदर मागणीचे निवेदन परळीचे तहसीलदार यांना देण्यात आले. याप्रसंगी धनगर समाजाचे युवा नेते नवनाथ दाने, नगरसेवक गोविंद कुकर, ज्येष्ठ नेते शिवाजीराव सरवदे, रासपाचे जिल्हाध्यक्ष कपिल गाडेकर, संपादक एन. के. आप्पा वडगावकर, माणिक सरवदे, श्याम कुकर, राम कुकर, मुंजाभाऊ फुके, वैजनाथ जगाडे, परमेश्वर होळकर, माणिक सरवदे, लक्ष्मण कुकर, अमोल सर्वदे, सचिन जगाडे, दगडू कुकर, मंजुनाथ कुकर, कारभारी सरवदे, संभाजी फुके, दादाराव फुके, माणिक फुके, परमेश्वर सरवदे, ज्ञानोबा सरवदे,नवनाथ सरवदे, तुकाराम सरवदे,भरत सरवदे,हनुमान सरवदे आदी कार्यकर्ते, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा