परळी तालुक्यातील बेलंबा येथे सुजातदादा आंबेडकर यांचे बॅनर फाडले गुन्हा दाखल करण्याची वंचितची मागणी

परळी तालुक्यातील बेलंबा येथे सुजातदादा आंबेडकर यांचे बॅनर फाडले 

 गुन्हा दाखल करण्याची वंचितची मागणी 

परळी प्रतिनिधी.     वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांच्या परळी येथील एल्गार महासभेच्या निमित्ताने बेलंबा,ता.परळी येथे लावण्यात आलेले बॅनर फाडल्याने गावात तणाव निर्माण झाला असून याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलिसांना करण्यात आली आहे.
   याबाबत अधिक माहिती अशी की, नुकतीच दिनांक 29 सप्टेंबर रोजी परळी येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांची भव्य एल्गार सभा झाली.सभेच्या प्रचारासाठी तालुक्यातील बेलंबा येथील कार्यकर्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर सुजातदादा आंबेडकर यांचे बॅनर लावले होते. सदरील बॅनर खोडसाळ व जातीयवाद्यांनी फाडल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला असून या घटनेने कार्यकर्त्यातून  तीव्र संताप व्यक्त होत आहे.
    या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काल परळी ग्रामीण पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले असून आरोपीवर कारवाई करून अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने