वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते शाकेर अहमद यांच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते शाकेर अहमद यांच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न 

परळी प्रतिनिधी.    वंचित बहुजन आघाडीतील मुस्लिम समाजाचे युवा नेते शाकेर अहमद यांच्या कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उपाध्यक्ष फारुख अहमद तसेच  जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांच्या हस्ते करण्यात आले. 
    परळी शहरातील पेठ मोहल्ला येथे शाकेर अहमद यांनी आपले संपर्क कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाचे काल भव्य एल्गार महासभेच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष फारुख अहमद तसेच जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पश्चिम जिल्हा अध्यक्ष अजय सरवदे, तालुका अध्यक्ष गौतम साळवे, राजेश सरोदे, अकबर खलील शेख,मुज्मील शेख,तुराब सय्यद, अब्बास खान, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने