परळीकरांनो काम काम करणाऱांना निवडून द्या
चमकेगिरी करणारांना त्यांची जागा दाखवा
परळी प्रतिनिधी. परळी नगर परिषदेच्या एकूण 17 वार्डातील 35 नगरसेवकांसाठी आज दिनांक 8 ऑक्टोंबर रोजी परळी नगर परिषदेच्या कार्यालयात आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यामध्ये ओबीसी प्रवर्गासाठी 9 नगरसेवक अनुसूचित जातीसाठी 6 तर 1 नगरसेवक पद अनुसूचित जमातीला मिळाले आहे. उर्वरित सर्व खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने परळी शहरात नगरपालिकेचे आज पासून वेध लागले असे म्हणावयास हरकत नाही. इच्छुक आणि गेल्या अनेक महिन्यापासून गुडघ्याला बाशिंग बांधून असलेले उमेदवार आता कामाला लागलेले दिसत आहेत.
नगरपालिका निवडणुकांचे बिगुल अर्थात कधी निवडणूक होणार याचा कार्यक्रम लवकरच निवडणूक आयोगाच्या वतीने आता जाहीर होण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष प्रत्येक वार्डात आपल्या उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात करतील तसेच इच्छुक असणारे आणि यापूर्वी माजी नगरसेवक असलेले सर्वजण आतापासून तयारीला लागतील. किंवा तिकिटासाठी मोर्चे बांधणी करतील. हॉटेल, धाब्यावरील पार्ट्या वाढलेल्या दिसतील.
कोणता नगरसेवक लोकांची कामे करतो आणि कोणता नगरसेवक फक्त चमकेगिरी करतो हेही शहरातील जनतेला चांगले माहित झालेले आहे .जनतेच्या प्रश्नावर नेहमीच धावून जाऊन लोकांची कामे करणाऱ्या नगरसेवकांना अथवा नवीन उमेदवारांना शहरातील सुजाण मतदारांनी निवडून नगरपालिकेत आपला लोकप्रतिनिधी म्हणून पाठवण्याची आवश्यकता आहे. जे लोक सतत लोकांची कामे करतात अशांना त्यांच्या कामाची पावती जनतेने दिलीच पाहिजे.
अनेक नगरसेवक पैशाच्या बळावर नगरसेवक म्हणून निवडून येतात मात्र एकदा निवडून आले की पुन्हा मात्र वार्डात फिरताना दिसत नाहीत. असे शोभेची भावले बनून राहिलेल्या मागील पाच वर्षातील नगरसेवकांना लोकांनी त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. कुणी कितीही पैसेवाला असला आणि तो सर्वसामान्य जनतेच्या मदतीला येत नसेल लोकांची कामे करीत नसेल तर अशा नगरसेवकांचा काय उपयोग हे तितकेच महत्त्वाचे आहे.
आपल्या पक्षाचे नेते अथवा पुढारी आल्यानंतर त्यांच्या पुढे पुढे करणारे, कामात कमी आणि फोटोमध्ये जास्त दिसणारे, चमकेगीरी करणाऱ्या लोकांना जनतेने दूर सारून खऱ्या अर्थाने लोकसेवक बनवून कामे करणाऱ्या लोकांना आता परळीतील जनतेने सहकार्य केले पाहिजे.

टिप्पणी पोस्ट करा