दारावर आलेल्या उमेदवारांना विचारा,तु गल्लीसाठी काय केलंस ?
परळी ( रानबा गायकवाड) सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीचे वेध अनेक हौसे,गवसे आणि आणि नवसे यांना लागले आहेत.स्थानिक स्वराज्य संस्था अर्थातच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पालिका निवडणुका.कधीही या तिन्ही संस्थेच्या निवडणूकांच्या तारखा निवडणूक आयोग जाहीर करू शकतो.त्यामुळे इच्छुक उमेदवार मोठ्या प्रमाणात तयारीला लागले आहेत.प्रचाराला लागले आहेत.
अनेक जण सतत लोकांची कामे करीत असतात.मग ती स्वतःच्या गल्लीत असोत किंवा गावात.कुणी काम घेऊन गेला तर त्याचे काम करण्यासाठी तन मन धन देतात.त्यामुळे अशी अनेक कार्यकर्ते आहेत नेते आहेत जे सतत लोकांच्या सेवेत असतात.जनतेच्या संपर्कात असतात.लोकांच्या कामासाठी काळ आणि वेळ पाहत नाहीत.ज्याला गरज आहे त्यासाठी धाऊन जातात.
सर्वसामान्य जनतेची कामेच काय असतात तर कुणाची तहसीलची,कुणाची पोलीस स्टेशनची,कुणाची दवाखान्याची तर कुणाची नगर पालिकेची.गावातील, गल्लीतील, वार्डातील स्वच्छता,पाणी आणि लाईटची.यासाठी संबंधित व्यक्ती बरोबर जावे लागते किंवा कधी कधी कार्यकर्ता आणि नेता फोनवरून सुध्दा ज्या विभागाचे काम आहे त्या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून लोकांची कामे करून देतात.कधी कधी एखाद्या कामासाठी अनेक वेळा चकरा माराव्या लागतात.निवेदने द्यावे लागतात,आंदोलने करावी लागतात तेंव्हा प्रश्न मार्गी लागतो.
आता जेंव्हा निवडणूका लागतात तेंव्हा अनेकांना आपण झेड.पी.मेंबर, पंचायत समिती मेंबर किंवा नगर पालिकेचा नगरसेवक होण्याची स्वप्ने पडतात.आपणच कसे दावेदार आहोत हे सांगायला लागतात.कधीच कुणाला चहा न पाजणारा दिसल त्याला चहा बरोबर त्याची इतरही फरमाईश पुर्ण करतात.आपणाला एवढीबार संधी द्या गल्लीचा विकास केल्याशिवाय राहणार नाही असं सांगायला लागतात.
जो माणूस,जो कार्यकर्ता 5 वर्षात कधी कुणाच्या दारात गेला नाही.ज्याने पाच वर्षांत कधी कुणाचे काम केले नाही.कधी गावाचं सोडा गल्लीच्या प्रश्नावर शासन - प्रशासनाला भांडला नाही असा माणूस निवडणून आल्यावर लोकांची कामे करील याचा काय भरोसा.निवडणूक लागल्यावर कुठुनही,कशीही उमेदवारी घेऊन जर कुणी दारात मतदान मागायला येणारांना मतदारांनी पैशाकडे न पाहता हे विचारायला पाहिजे की आमच्या गल्लीसाठी, गावांसाठी तु काय केलंस,कोणती कामे केलीस, कोणाच्या मदतीला आलास काय? त्याचे उत्तरच तुम्हाला सांगून जाईल त्याला मतदान करायचे की नाही.

टिप्पणी पोस्ट करा