प्रा.एस.बी .रणखांबे 'महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय शिक्षक' पुरस्काराने सन्मानित
परळी प्रतिनिधी. जवाहर एज्युकेशन सोसायटी'चे वैद्यनाथ कॉलेज ,परळी वैजनाथ येथील भूगोल विभागात कार्यरत प्रा.एस.बी.रणखांबे यांना नुकताच महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य तर्फे दिला जाणारा सन्मानाचा राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
हा पुरस्कार सन्मान सोहळा दिनांक 28 ऑक्टोबर २०२५ रोजी स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर नाट्यगृह ,जिल्हा रत्नागिरी येथे पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. गिरीश भाऊ जाधव, मा. आ. किरण सामंत,आयोजक मा. व्यंकटराव जाधव आदि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल वैद्यनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. व्ही .जगतकर यांनी प्रा.एस.बी.रणखांबे यांचा महाविद्यालयात शॉल,श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला.तसेच याप्रसंगी कार्यालयीन कर्मचार्यातर्फे अधिक्षक सुनिता धर्माधिकारी व लेखापाल नवनाथ घुले यानीही प्रा.रणखाबे यांचा सत्कार केला.
याप्रसंगी बोलताना महात्मा फुले यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार वैद्यनाथ कॉलेज व भूगोल विभागासाठी अत्यंत सन्मानाचा असल्याचे उद्गार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.व्ही जगतकर यांनी काढले. तसेच आपल्या हातून शिक्षण क्षेत्रात अशीच भरीव कामगिरी व्हावी व शिक्षण क्षेत्रात आपली प्रगती व्हावी अशा शुभेच्छा दिल्या,तर हा पुरस्कार माझ्यासाठी विशेष असून शिक्षण क्षेत्रात अधिक जोमाने व उत्साहाने कार्य करण्याची प्रेरणा या पुरस्कारापासून मिळाली आहे. अशी भावना या सत्काराला उत्तर देताना प्रा.एस.बी.रणखांबे यांनी व्यक्त केली .
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.व्ही.जगतकर,उपप्राचार्य,डॉ.व्ही.बी.गायकवाड, प्रा.डी.के.आंधळे,प्रा.एच.डी.मुंडे, भूगोल विभागप्रमुख प्रा. डॉ.व्ही.एल.फड, पी.जी.डायरेक्टर प्रा. डॉ.आर.डी. राठोड, कनिष्ठ विभागाचे समन्वयक प्रा. यु.आर.कांदे,प्रा.डॉ.बी.व्ही.केंद्रे, प्रा. डॉ.व्ही.जे.चव्हाण,प्रा.डॉ.आर.जे.चाटे, प्रा.डॉ.एस.व्ही.समीर,प्रा.एन.एस. जाधव ,कार्यालयीन कर्मचारी तसेच तासिका तत्वावरील प्राध्यापक आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिलीप गायकवाड यांनी केले तर आभार प्रा.डी.आर.मुंडे यांनी केले.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा.रणखांबे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा