परळीतील अपूर्ण कामांच्या पूर्णतेसाठी मनसेचेनगर परिषदेपुढे अर्धनग्न आंदोलन संपन्न

परळीतील अपूर्ण कामांच्या पूर्णतेसाठी मनसेचे
नगर परिषदेपुढे अर्धनग्न आंदोलन संपन्न

परळी/ प्रतिनिधी   

   परळी शहरातील रखडलेले विविध अपूर्ण सार्वजनिक कामे पूर्ण करावीत या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना परळीच्या वतीने नगरपरिषद कार्यालयासमोर आज दि 29 ऑक्टोबर रोजी अर्ध नग्न आंदोलन करण्यात आले. 
     परळी शहरातील नगर परिषदेमार्फत विविध योजनेअंतर्गत करण्यात आलेली जिजामाता उद्यान, डॉ भालचंद्र वाचनालय, भिमवाडी येथील बौद्ध विहार, अल्पसंख्यांक मुलींचे वस्तीगृह,अर्धवट मलनिसारण व जल शुद्धीकरण केंद्राचे काम, अर्धवट पाणीपुरवठा पाईपलाईन, अर्धवट अंडरग्राउंड नाली ची कामे आदी महत्त्वाच्या कामांचे गेल्या अनेक वर्षापासून कामे अर्धवट अवस्थेत आहेत. ते केव्हा पूर्ण करणार व परळीकरांच्या  सेवेत देणार या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने परळी नगरपरिषद कार्यालय समोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे व उपमुख्य अधिकारी संतोष रोडे यांनी निवेदन स्वीकारून कामे लवकरात लवकर पूर्ण करू असे लेखी आश्वासन दिले. 
   या आंदोलनात मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता दहिवाळ, तालुका अध्यक्ष श्रीकांत पाथरकर, शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर, तालुका उपाध्यक्ष विठ्ठलराव झिलमेवाड, शहर उपाध्यक्ष प्रशांत कांमाळे ,मनसे विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष हनुमान सातपुते, आत्माराम खंदारकर आदी उपस्थित होते. मनसेच्या या आंदोलनाची परिसरात मात्र जोरदार चर्चा होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने