दिवाळी संपताच परळीत मटका पुन्हा तेजीत रस्त्यांवरील दुकानांचाही होतोय वापर

दिवाळी संपताच परळीत मटका  पुन्हा तेजीत 
 रस्त्यांवरील दुकानांचाही होतोय वापर 


परळी प्रतिनिधी.        शहरातील दिवाळीच्या सणाचा उत्साह संपतो न संपतो तोच पुन्हा एकदा अवैध मटका जुगार पुन्हा तेजीत दिसत आहे.पोलिसांच्या नाकावर टिच्चून शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर खुलेआम मटका घेणारी दुकाने मटका घेत असल्याने कायदा व सुव्यवस्था  बिघडून  गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सोसावा लागणार आहे.
   परळी शहरातील अनेक अवैध धंदे जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही काळ बंद होते.परंतू त्यानंतर मात्र हे बंद असलेले अवैध धंदे याला आळा घालण्यास पोलिसांना अपयश आले आहे.दिवाळी सणाच्या निमित्ताने सरकारी सुट्टी घेतल्याप्रमाणे एक दोन दिवस मटका बंद होता मात्र दिवाळी संपताच पुन्हा एकदा नव्या दमाने अवैध मटका तेजीत दिसत आहे.
    अवैध मटका  लपुन जपून न राहता आता सर्रास शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर खुलेआम दुकानांतून घेतला जात आहे.दुकानाची पाटी एक अन धंदा दुसराच असा प्रकार चालू आहे.त्यामुळे शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढून सर्वसामान्य माणसाला याचा फटका बसू शकतो.शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी अशा प्रकारे चालणा-या अवैध धंदे आणि मटक्यावर पोलिसांनी लगाम घालावा अशी नागरिकांतून चर्चा होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने