प्रतिक्षा गवळीला मैसूर विद्यापीठातून विज्ञान शाखेत पीएचडी प्रदान

प्रतिक्षा गवळीला मैसूर विद्यापीठातून विज्ञान शाखेत पीएचडी प्रदान 



 परळी प्रतिनिधी.      आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गवळी यांची कन्या प्रतिक्षा गवळीला कर्नाटक राज्यातील मैसूर विद्यापीठातून विज्ञान शाखेत नुकतीच पीएचडी प्रदान करण्यात आली आहे.तिने मिळविलेल्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे.
      प्रतिक्षा प्रभाकर गवळी ही बौद्ध समाजाची विद्यार्थ्यांनी फकीर जवळा तालुका धारूर या ग्रामीण भागातून आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने आपले उच्च शिक्षण घेतल्यानंतर सध्या मैसूर विद्यापीठातंर्गत सी.एस.आय.आर.रिसर्च इन्स्टिट्युट मधून संशोधन प्रबंध (Thesis):  साठवलेल्या उत्पादनांच्या कीटकांविरूद्ध आवश्यक तेल-आधारित जैव-धूमक (bio-fumigant) तयार करणे आणि त्याची कार्यक्षमता तपासणे.हा सादर केला होता.तिच्या या शोध प्रबंधास मैसूर विद्यापीठाने मान्यता देऊन तिला पीएचडी प्रदान केली आहे. प्रतिक्षाने पीएचडी मिळवल्यानंतर तिचा मृगदायवन महाविहार,सारनाथ, जवळा फकीर येथील बुद्ध विहारात समाजाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
    प्रतिक्षाने  मिळविलेल्या या पीएचडी यशाबद्दल तिचे भदंत पयातीस महाथेरो  व  मान्यवर आर जी.कांबळे , गोपीनाथ जोंधळे, बा. ह. वाघमारे, एम. डी. वाघमारे, उत्तम कांबळे,  जेष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड,एस एस शिंदे साहेब , अर्जुन चोपडे, गौतम शिंदे, गौतम बनसोडे , स्नेहा खंडागळे, शांता चोपडे, रेखा उजगरे, वंदना गोदाम , शीला उजगरे, शांता गवळी, प्रभाकर गवळी, सी. एस. साळवे मॅडम आदिंनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने