रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी आता कामगारांच्या चेहऱ्यांचे होणार स्कॅनिंग
बीड जिल्ह्यात लवकरच होणार सुरुवात
परळी ( रानबा गायकवाड ) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थातच मनरेगा हे ग्रामीण भागातील शेतमजूर, कष्टकरी, कामगारांना रोजगार मिळावा म्हणून काढलेली केंद्र सरकारची योजना आहे. परंतु या योजनेत कामगारांच्या नावावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. यावर उपाय म्हणून आता राज्य सरकारने रोजगार हमी योजनेतील मजुरांच्या चेहऱ्याची ई केवायसी करण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे आता मात्र पंचायत समिती, कृषी कार्यालय, बांधकाम विभागामार्फत योजना राबविणाऱ्या कर्मचाऱ्यांना चेहऱ्याचा ई केवायसी करताना फेस येणार आहे हे निश्चित.
आतापर्यंत रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या कामगारांचे बोगस उपस्थिती दाखवून कोट्यावधी रुपये उचलले जात होते. प्रत्यक्षात मात्र कामावर जेसीबी अथवा अन्य यंत्रांच्या साह्याने काम करून घेतले जात होते. आणि बोगस रजिस्टर तयार करून भ्रष्टाचार केला जात होता अशा प्रकारच्या तक्रारी शासनापर्यंत मोठ्या प्रमाणात येत होत्या या तक्रांची दखल घेत महाराष्ट्र सरकारने आता मनरेगा पोर्टलवरून एन एम एम एस प्रणालीवर कामगारांचे ही केवायसी आणि फोटो स्कॅनिंग रोजगार सेवकांना अनिवार्य केले आहे त्यामुळे भ्रष्टाचार रोखण्यात सरकारला यश येईल असे दिसते.

टिप्पणी पोस्ट करा