महाबोधी विहार बुद्धगयाचे भंते विनाचार्य यांची 16 ऑक्टोंबर रोजी सिरसाळा येथे धम्मदेसना

महाबोधी विहार बुद्धगयाचे भंते विनाचार्य यांची 16 ऑक्टोंबर रोजी सिरसाळा येथे धम्मदेसना 


परळी प्रतिनिधी.     जगातील बौद्ध धर्मियांचे पवित्र स्थळ महाबोधी महाविहार बुद्धगया येथील महाविहार मुक्ती आंदोलनाचे नेतृत्व करणारे भन्ते विनाचार्यजी यांची 16 ऑक्टोबर 2025 रोजी सिरसाळा येथे धम्मदेसना होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यशोधरा महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. 
    भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा ग्रंथ वाचन समारोप व भंते विनाचार्य यांची धम्मदेसना 16 ऑक्टोबर रोजी सिरसाळा येथील सम्राट अशोक बुद्ध विहार, कुशीनगर येथे आयोजित करण्यात आलेली आहे. संभाजीनगर येथील वस्तू व सेवा कर विभागाचे उप आयुक्त रवींद्र जोगदंड अध्यक्ष स्थान भूषविणार आहेत. या कार्यक्रमास मुंबईचे उपजिल्हाधिकारी महादेव किरवले तसेच मुख्य समन्वयक राजेश पवार यांचे उपस्थिती असणार आहे. तर रवींद्र हिरोळे, संदीप कदम प्रकाश कांबळे स्वागताध्यक्ष सत्यजित साळवे हे उपस्थिती राहणार आहे. 
   ग्रंथ वाचन सांगता समारोपाच्या निमित्ताने सकाळी साडेआठ वाजता धम्म रॅली निघणार आहे. तर दुपारी 12:30  वाजता भंते विनाचार्यजी उपस्थित बौद्ध उपासक उपासिका व नागरिकांना धम्मदेशना देतील. या कार्यक्रमास सिरसाळा व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यशोधरा महिला मंडळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सिरसाळा यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने