वर्षावास समापन निमित्त जवळा फकीर येथे 11 ऑक्टोबर रोजी भिक्खू निवासाचे भूमीपुजन
दान दात्यांनी दान करण्याचे आवाहन
परळी प्रतिनिधी. अश्विन पौर्णिमा निमित्त वर्षावास समापन धम्मदेशना व या निमित्ताने मृगदायवन महाविहार, सारनाथ, जवळा फकीर ता.धारुर येथे दिनांक 11 ऑक्टोबर रोजी भिक्खू निवास बांधकामांचे भूमीपूजन तसेच आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली असल्याचे भदंत पय्यातीस महाथेरो यांनी सांगितले.भिक्खू निवासासाठी दान दात्यांनी दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जवळा फकीर येथील मृगदायन महाविहारात भदंत पय्यातीस महाथेरो यांचा वर्षावास चालू होता. अश्विन पौर्णिमा निमित्त वर्षावास समारोप दिनांक 11 ऑक्टोबर रोजी दुपारी 12: 30 वाजता वाजता सुरू होणार आहे.सकाळी 10 वाजता बोधी वृक्षाची पूजा,कालकथित डॉ.वैभव माधवराव वाघमारे,बाभळगावकर, अहमदपूर यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण, दुपारी 12:30 वाजता त्रिशरण व पंचशील,पाहुण्यांचा सत्कार, मार्गदर्शन आणि त्यानंतर धम्मदेशना संपन्न होणार आहे. तर अंबाजोगाई येथील डॉ.रमेश जोगदंड हे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेणार आहेत.
या कार्यक्रमास बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे,एस.एस.शिंदे, गोपीनाथ बनसोडे,गौतम सोनवणे, कल्याण भंडारे,अरुण जाधव, आदिनाथ वाघमारे,स्नेहा खंडागळे,प्रा.गौतम खेमाडे,एम.एस.डोंगरे,आर.जी.कांबळे, गोपीनाथ जोंधळे,उत्तम कांबळे,बा.ह.वाघमारे,विनय ढवळे, चंद्रकांत कांबळे, बालाजी तुरेवाले, सुनील शिंदे एम .बी.वाघमारे, अंबाजोगाई येथील उत्तम डोंगरे, सावंत, गुलाब शिरसाट, करुणा गौतम जोगदंड, कृष्णा सरोदे, माजलगाव येथील डॉक्टर चंद्रशेखर उजगरे, डॉक्टर दिनकर मस्के, नवनाथ शिनगारे, सदाशिव भालेराव, प्रभाकर साळवे, श्रीमंत डोंगरे, अशोक कांबळे, एस. बी. मोरे, एडवोकेट दशरथ मकासरे, बचुटे सर आदी उपस्थित राहणार आहेत. तर अंबाजोगाई येथील उपासिका शीलाताई डोंगरे, उत्तम डोंगरे परिवाराकडून भोजनदान देण्यात येणार आहे.
मृगदायावन महाविहार सारनाथ येथील येथे होणाऱ्या भिक्खू निवासासाठी व विपश्यना धम्म हॉलच्या बांधकामाकरिता दान दात्यांनी आपले आर्थिक दान भदंत पय्यातीस महाथेरो यांच्या फोन पे नंबर 9096787141 या नंबरवर दान करु शकता.उपासक,उपासिकांनी शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी व्हावे व कार्क्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा