म. सा.प.च्या स्व. सुवालालजी वाकेकर स्मृती आदर्श शिक्षक व सेवागौरव पुरस्कारांचे थाटात वितरण शिक्षणाशिवाय सर्वांगीण प्रगती अशक्य - किरणकुमार गित्ते

म. सा.प.च्या स्व. सुवालालजी वाकेकर स्मृती आदर्श शिक्षक व सेवागौरव पुरस्कारांचे थाटात वितरण 

 शिक्षणाशिवाय सर्वांगीण प्रगती अशक्य -  किरणकुमार गित्ते 

परळी (प्रतिनिधी):-  मराठवाडा साहित्य परिषद परळी वैजनाथ शाखेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार, स्व. सुवालालजी वाकेकर स्मृती सेवागौरव पुरस्कार, साहित्य सेवागौरव पुरस्कार तसेच विशेष सेवा कार्यगौरव पुरस्कार येथील वैद्यनाथ कॉलेजच्या सभागृहात त्रिपुरा राज्याचे बांधकाम,आरोग्य, पर्यटन,सांस्कृतिक कार्य विकास सचिव किरणकुमार गित्ते साहेब यांच्या शुभहस्ते वितरित करण्यात आले. 
   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परळी मसापचे अध्यक्ष विजयजी वाकेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून जवाहर एज्युकेशन सोसायटीचे सचिव दत्ताप्पा इटके गुरुजी,अंबाजोगाई मसापचे अध्यक्ष अमर हबीब, सेवानिवृत्त नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, परळी मसापचे मार्गदर्शक बाळासाहेब देशमुख,प्राचार्य जगतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी रामानंद तीर्थ ,डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, स्व. सुवालालजी वाकेकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
      मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक व साहित्य क्षेत्रात  उत्कृष्ट कार्य करणाऱ्या श्यामसुंदर मुंडे, अनुप कुमार कुसुमकर, अजय जोशी, मोहन कांदे, मुरलीधर कराड, प्रमोद गादेकर, दिगंबर परसेवाड, रूपाली ढाळे, रंजना जाधव,मंजुषा शिंदे, सुषमा साळेगावकर या शिक्षक  शिक्षिकाकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला याशिवाय महाराष्ट्रामध्ये अत्यंत सन्मानाच्या समजल्या जाणाऱ्या स्वर्गीय सुवालालजी वाकेकर स्मृती सेवा गौरव पुरस्कार हा शासकीय सेवेत राहून सामाजिक सलोखा जपणारे आणि उत्कृष्ट सेवा बजावणारे परळीचे सेवानिवृत्त नायब तहसीलदार बाबुरावजी रुपनर तसेच रत्नेश्वर विद्यालयाचे प्राचार्य प्रदीप तुळशीराम मुंडे सर यांना तर यंदाच्या  स्व.सुवालालजी वाकेकर स्मृती साहित्य सेवा गौरव पुरस्कारासाठी शेतीमातीसाठी झटणारे आणि बहुआयामी लेखन प्रकार हाताळलेले अंबाजोगाई मसापचे अध्यक्ष अमर हबीब सर यांना वैशिष्ट्यपूर्ण लेखनाबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
     या कार्यक्रमात उपस्थित पुरस्कारार्थी शिक्षकांना शैक्षणिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या नागरिकांना आणि सभागृहातील शिक्षणप्रेमी लोकांना त्रिपुरा राज्याचे सचिव किरणकुमार गित्ते यांनी शिक्षण हे मानवी जीवनामध्ये आमुलाग्र बदल घडवण्याचे एकमेव साधन असून उत्कृष्ट समाजनिर्मिती ही शिक्षणाशिवाय अशक्य असून भावी पिढी सुजाण बनवायची असेल तर सर्वांनीच शिक्षणाकडे सजगतेने पाहून दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे आणि असे दर्जेदार शिक्षण हे कितीही तंत्रज्ञान पुढे गेले तरी चांगल्या शिक्षकांशिवाय दर्जेदार शिक्षण अशक्य आहे.
   म्हणून चांगल्या शिक्षकांचा सन्मान करणे महत्त्वाचे असते. मराठवाडा साहित्य परिषद परळी शाखेने शिक्षकांचा सत्कार करून मोलाची भूमिका पार पाडली आहे. 
    याशिवाय स्वर्गीय सुवालालजी वाकेकर यांनी सामाजिक कार्याची बांधिलकी जोपासली म्हणूनच त्यांच्या नावे विजयजी वाकेकर हे पुरस्कार देत असतात.
      या अगोदर मला सुद्धा स्वर्गीय सुवालालजी वाकेकर यांच्या स्मृतिप्रतिर्थ पुरस्कार दिला होता, आणि आज माझ्याच हस्ते त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ पुरस्कार वितरित केले जात आहेत आणि परळी मसापचे अध्यक्ष विजयशेठ वाकेकर हे त्यांच्या कार्याचा वसा पुढे चालवत आहेत याचा मनस्वी आनंद असल्याचे प्रतिपादन माननीय किरणकुमार गीते यांनी केले.
       या कार्यक्रमातून दत्ताप्पा इटके गुरुजी यांनी मी या जवाहर शिक्षण संस्थेचा सचिव असून या अगोदर याच संस्थेमध्ये स्वर्गीय सुवालालजी वाकेकर हे अध्यक्ष असताना या संस्थेमध्ये आणि  नगरपालिकेमध्ये सुद्धा मी त्यांच्यासोबत काम केले असल्याचे सांगितले.
    तर याही पुढे विधायक कामासाठी आपण विजयशेठ यांनी मासापची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतल्यामुळे मराठवाडा साहित्य परिषदेला यापुढेही नियमित मदत करू  असे सांगितले.
      तर माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो ,सतत नवनवीन काहीतरी शिकले पाहिजे आणि नवीन तंत्रज्ञानातून जीवन समृद्ध केले पाहिजे असे प्रतिपादन स्वर्गीय सुवालालजी वाकेकर स्मृती साहित्य गौरव पुरस्काराचे मानकरी अमर हबीब यांनी केले,  
   अध्यक्षीय समारोपात विजयशेठ वाकेकर यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणाऱ्या पुरस्काराशिवाय मराठवाडा साहित्य परिषद चालवताना अध्यक्ष म्हणून जी जबाबदारी  वाट्याला येईल ती प्रामाणिक पार पाडून परळीच्या  शैक्षणिक आणि साहित्यिक तसेच सांस्कृतिक बळकटी देण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असल्याचे सुतोवाच ककेले.
याच कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या शुभहस्ते दैनिक लोकमत तर्फे देण्यात आलेल्या बीडचे भूमिपुत्र पुरस्काराचे मानकरी ठरलेले मंत्रालय मुंबई येथील कक्ष अधिकारी विशालजी राठोड, पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव दिपकराव तांदळे, ज्ञानबोधिनी विद्यालयाचे मुख्याध्यापक लक्ष्मण मुंडे सर, केदारी महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक चेतन सौंदळे यांचाही मान्यवरांच्या शुभहस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.
     याशिवाय आदर्श शिक्षक पुरस्काराला व आपल्या झालेल्या सत्काराला रंजना जाधव मॅडम व गादेकर सर यांनी प्रतिनिधिक स्वरूपात उत्तर दिले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक परळी मसापचे सचिव डॉ. राजकुमार यल्लावाड यांनी केले तर कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कवी/ शाहीर अनंत मुंडे व बालाजी कांबळे यांनी केले.आभार प्रदर्शन मसापचे उपाध्यक्ष प्राचार्य अरुण पवार यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी निवड समिती प्रमुख बंडू आघाव, प्रा. संजय आघाव, सिद्धेश्वर इंगोले, दिवाकर जोशी, अर्चना चव्हाण, दीपकशेठ वाकेकर , गणगोपलवाड, अशोक पिंगळे आदींचे सहकार्य लाभले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने