पुरात वाहून गेलेल्या ममदापूर येथील तरुणाचा मृतदेह सापडला


पुरात वाहून गेलेल्या ममदापूर येथील तरुणाचा मृतदेह सापडला

परळी प्रतिनिधी.     मौजे कौडगाव हुडा येथील लिंगी  नदीमध्ये दिनांक 16 सप्टेंबर रोजी जोरदार पावसामुळे लिंगी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या ममदापूर येथे तरुणाचा मृतदेह आज दिनांक 19 रोजी सकाळी सापडल्याची माहिती तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिली आहे.
     दिनांक 16 नोव्हेंबर रोजी रात्री 8  वाजता वाहून गेलेले व्यक्ती शिवराज माणिकराव कदम वय 38 वर्षे रा.ममदापुर ता परळी  यांचा शोध कार्य करत असताना दिनांक 19/ 9/ 2025 रोजी सकाळी ९ वाजता अथक प्रयत्नाने मृतदेह आढळून आला . घटनास्थळी तहसीलदार परळी, सहा पो नि सिरसाळा , मंडळ अधिकारी  व तलाठी सिरसाळा मंडळ , छत्रपती संभाजीनगर यथून आलेली आपत्ती व्यवस्थापन टीम , नगर परिषद फायरबिरगेड व मयताचे नातेवाईक , ममदापुर, बोरखेड व कौडगाव हुडा येथील नागरिक , भोई मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने