परळीत आठवड्यात अल्पवयीन मुलीवर बलात्काराची दुसरी घटना
संभाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
परळी वैजनाथ,( प्रतिनिधी) परळी शहरात बलात्काराची मालिका काही थांबता थांबेना.आठवड्यात अल्पवयीन मुलीवर बलात्काराची दुसरी घटना शहरात घडली आहे.याप्रकरणी संभाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.तर आरोपींना अटक करण्यात आल्याचेही समजते.
परळी रेल्वे स्थानकात सहा वर्षीय चिमुरडी वरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता परळीत पुन्हा आणखी एक हैवानी कृत्य समोर आले आहे. या प्रकारातही एका अल्पवयीन मुलीला गल्लीतीलच विकृतांनी उचलून नेऊन तिच्यावर विकृत पद्धतीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात असुन या घटनेची हकीकत चीड आणणारी आहे. याबाबत चार जणाविरुद्ध संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
परळी शहरातील बरकतनगर भागात घडलेल्या या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आणि संतापजनक घटनेची पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहिती अशी की, बरकत नगर भागातील एका अल्पवयीन केवळ बारा वर्षाच्या मुलीला ती दुकानावर गेलेली असताना रस्त्यात तिला उचलून नेले. अंधारात एका आड मार्गावरील पांदणीत नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले. याच गल्लीत राहणाऱ्या हैवानी वृत्तीच्या चार युवकांनी ठरवून या मुलीला उचलले व तिला पांदणीत नेले. चारपैकी दोन आरोपींनी तिला पकडून तिच्यावर बलात्कार करण्यास इतर दोघांना मदत केली.
एकाच वेळी दोघांनी अमानवी पद्धतीने बलात्कार केला. या घटनेने संपूर्ण शहरात संताप व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच घडलेले रेल्वे स्थानकावरील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण संपूर्ण राज्यभर चर्चेत असतानाच आणखी अशाच प्रकारच्या हैवानी कृत्याचे प्रकरण पुढे आल्यान मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपी विरुद्ध संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास संभाजीनगर पोलीस करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा