औष्णिक विद्युत केंद्र परळी च्या आस्थापनेतील निरीक्षण अहवालानुसार कायदेशीर कारवाई तात्काळ करावी अन्यथा अन्नत्याग उपोषण- भाई गौतम आगळे

औष्णिक विद्युत केंद्र परळी च्या आस्थापनेतील निरीक्षण अहवालानुसार  कायदेशीर कारवाई तात्काळ करावीअन्यथा  अन्नत्याग उपोषण-  भाई गौतम आगळे

परळी ( प्रतिनिधी ) परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या आस्थापनेची सरकारी कामगार अधिकारी सुधाकर कोणाळे, निरीक्षक काशीद चव्हाण व संबंधित कर्मचाऱ्यांनी १९ ऑगस्ट २०२५ ते २३ आॅगस्ट २०२५ सलग पाच दिवस  किमान वेतन कायदा 1948 सह विविध प्रचलित कामगार कायद्याअंतर्गत निरीक्षण केले आहे. त्याप्रमाणे सर्व विभाग प्रमुखांच्या अधिनस्त असलेले कंत्राटदार व संबंधित अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई तात्काळ करावी अन्यथा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून कंत्राटी कामगार प्रतिनिधी तथा रोजंदारी मजदूर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष भाई राजेश कुमार जोगदंड हे जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर अन्नत्याग उपोषण करतील, 
      असे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांना देऊन त्याच्या प्रतिलिपी संबंधित मंत्री महोदय व प्रशासनातील सनदी अधिकारी यांना देऊन मा. गोरगरीब कष्टकरी कामगारांचे लोकप्रिय आमदार सिद्धार्थ खरात यांना सदरिल प्रकरणात विशेष लक्ष देऊन उपेक्षित/वंचित असलेल्या परळी वीज कंत्राटी कामगारांना न्याय देण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती केली असल्याची माहिती कामगार नेते तथा संघटनेचे केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 
       याबाबत सविस्तर वृत्त असे की औष्णिक विद्युत केंद्र परळी येथील सर्व विभाग प्रमुख यांच्या अधिनस्त असलेले कंत्राटदार कार्यरत कंत्राटी कामगारांचा अर्धा व अर्ध्यापेक्षा जास्त पगार संबंधित अधिकारी व कंत्राटदार मागील अंदाजे 25 ते 30 वर्षापासून चोरी करून शासनाची व कंत्राटी कामगारांची फसवणूक करून लाखो कोटी रुपयांची सरकारची तिजोरी बेधडक लुटून, भ्रष्टाचार करून कंत्राटी कामगारांचे आजतागायत शोषण करत आहेत. मुख्य अभियंता हे मुख्य मालक असून कंत्राटदार यांनी कामगार कायद्याचे काटेकोरपणे पालन केले नाही तर, सर्वस्वी जबाबदारी मुख्य अभियंता औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथ यांचीच असते. त्यांनी कंत्राटी कामगार ( नियमन व निर्मूलन ) अधिनियम 1970 आणि किमान वेतन अधिनियम 1948 व अनुषंगिक लाभ कार्यरत कंत्राटी कामगारांना मिळतात का हे तपासणे गरजेचे असते. परंतु त्यांनी सुद्धा या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. सरकारी कामगार अधिकारी बीड यांनी निरीक्षणाबाबत आवश्यक माहिती व सुस्पष्ट अहवाल तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांना सादर करून त्याची एक छायांकित प्रत संघटनेस अवगत करण्यासाठी द्यावी. 
    अन्यथा दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून कामगार प्रतिनिधी तथा महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती, रोजंदारी मजदुर सेना मराठवाडा अध्यक्ष भाई राजेश कुमार जोगदंड हे जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर अन्नत्याग उपोषण करतील.     आंदोलनादरम्यान होणाऱ्या सर्व अनुचित प्रकारास महाराष्ट्र शासन, प्रशासनातील सनदी अधिकारी, जिल्हा प्रशासन आणि मुख्य अभियंता औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथ व्यवस्थापनच जबाबदार राहील असे मा.ना.मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांना दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी निवेदन सादर केले, त्यात नमूद केले आहे. अशी माहिती कामगार नेते तथा संघटनेचे केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्ध पत्रका द्वारे दिली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने