सदधम्म सेवा संघाच्या वतीने बाबुराव पोटभरे व विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार संपन्न

सदधम्म सेवा संघाच्या वतीने बाबुराव पोटभरे व विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार संपन्न 

माजलगाव  प्रतिनिधी.    बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांचा इंग्लड येथे लोकमतच्या वतीने महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन सन्मान केल्याबद्दल तसेच विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सदधम्म सेवा संघ माजलगावच्या वतीने  श्रावस्ती बुद्धविहार केसापूरी वसाहत माजलगांव येथे भाद्रपद पौर्णिमा निमित्त भदंन्त धम्मप्रिय थेरो (चैत्यभूमी दादर मुंबई) यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
    बाबुराव पोटभरे यांना लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन लंडन येथे महाराष्ट्ररत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.समाजातील विविध क्षेत्रातील प्राविण्य मिळवलेल्या MBBS 25 करिता प्रवेश मिळाल्याबद्दल आयु.श्रुती राहूल सुर्यतळ ,आयु.प्रणव प्रविण सिरसाठ ,आयु.धनश्री रविंद्र राऊत,आयु आर्या रामप्रभू साळूंके MPSC 25 करिता उत्तीर्ण झाल्याबद्दल आयु.रोहीत राजकुमार सोनवणे यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. 
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदाशिव भालेराव (अध्यक्ष सदधम्म सेवा संघ माजलगाव) हे होते. तर प्रस्तावित आयु पांडुरंग विठ्ठलराव जाधव कोषाध्यक्ष यांनी केले बुध्दगीत आयु गौतम घनघाव यांनी गायीचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्ममित्र नवनाथ शिनगारे यांनी केले कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते आयु . कचरू तात्या खळगे,आयु.राहूलजी सूर्यतळ (पोलिस निरीक्षक माजलगाव शहर ) कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगांवचे उपसभापती आयु श्रीहरी मोरे नाना, आयु.नवनाथ आन्ना धाईजे ,माजी नगरसेवक आयु.सचीन आंबा डोंगरे ,आयु भीमराव टाकणखार ,माजी समाजकल्याण सभापती बीड आयु अनुसया रामप्रभू साळूंके आयु काशिभाऊ साळवे,आयु लिलाताई उजगरे आयु.दशरथ मकसरे आयु.शिवाजी धाईजे आयु उत्तमराव शिंदे सदधम्म सेवा संघ माजलगांवचे सर्व पदाधिकारी सदस्य यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले . 
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडुरंग जाधव यांनी केले.कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात बौद्ध उपासक,उपासिका विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमानंतर  वंदना भालेराव व अल्का घनघाव यांच्या वतीने उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला ..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने