साथ कृषीकुलची ; यशोगाथा बळिराजाचीफळबाग लागवड केल्याने उत्पन्न वाढले; आर्थिक स्तर उंचवल्याने शेतकरी सुखावले

साथ कृषीकुलची ; यशोगाथा बळिराजाची

फळबाग लागवड केल्याने उत्पन्न वाढले; आर्थिक स्तर उंचवल्याने शेतकरी सुखावले   

         दत्तात्रय काळे (9558488686)

     पारंपरिक पीक पद्धती बदलून फळबागांची लागवड केल्याने शेतकऱ्यांच्या जीवनमानात आणि कौटुंबिक आर्थिक परिस्थितीत मोठा आमूलाग्र बदल घडून येत असल्याचे पाहायला मिळत आहे. जलनायक मयंक गांधी यांनी स्थापित केलेल्या ग्लोबल विकास ट्रस्ट आणि कृषिकुल मुळे हे बदल घडवण्याची किमया साकार होऊ शकली. ज्यामध्ये एचडीएफसी बँकेचे सुद्धा खूप मोठे योगदान आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न 30 हजारांहून तब्बल दहा लाखांपर्यंत उंचावले आहे. हे सकारात्मक बदल घडून आल्याने शेतकरी प्रचंड समाधानी झाले आहेत. येथील शेती ही कायम संकटाच्या गर्तेत असते. कधी येथे पाण्याचा दुष्काळ असतो तर कधी येथे शेतकऱ्यांना जास्त पावसामुळे नुकसान झेलावे लागते. याला पर्याय जर काही असेल तर आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेती आणि शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन वेळेवर मिळणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांची ही गरज ग्लोबल विकास ट्रस्ट संस्थेच्या माध्यमातून पूर्ण होत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. शेतीतील उत्पादन वाढल्याने त्यांचे आर्थिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनमान निश्चित उंचावले आहे.

जलनायक मयंक गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली ग्लोबल विकास ट्रस्ट ही संस्था शेतकऱ्यांना फळपीक लागवड करण्याच्या संदर्भात मोफत प्रशिक्षण देते. सिरसाळा येथे उभारण्यात आलेल्या कृषीकुलच्या भव्य संकुलात शेतकऱ्यांना दोन दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येते. ज्यामध्ये माती परीक्षण, मातीतील गुणधर्मानुसार पिकांची निवड, पिकांची निवड केल्यानंतर त्याची लागवड, वातावरणातील बदलांचा विचार करून पिकांची योग्य पद्धतीने काळजी कशी घ्यावी? त्याचबरोबर पिकांची काढणी करून त्याला योग्य पद्धतीने भाव कसा मिळेल? या दृष्टीने शेतकऱ्यांना बाजाराची योग्य माहिती देऊन त्याचे उत्पादन विक्री होईपर्यंत कृषिकुलच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. यामुळे नक्कीच फळपिकांचे दर्जेदार उत्पादन मिळून शेतकऱ्यांना योग्य पद्धतीचा भाव मिळतो.

शेतकऱ्यांना योग्य आणि दिशादर्शक मार्गदर्शन मिळाल्याने त्यांच्यातील शाश्वत शेती करण्याची नवी उमेद जागृत होऊ शकली आहे. बीड जिल्ह्यातील शेतकरी ऊस, कापूस, सोयाबीन आदि पारंपरिक पिकांवर पूर्वी अवलंबून असायचे, ज्यामधून त्यांना जेमतेम आर्थिक उत्पन्न मिळत असे. मात्र आता ग्लोबल विकास ट्रस्ट आणि कृषिकुलच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन आणि सल्ला मिळाल्याने फळपिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. आंबा, केळी, सीताफळ, डाळिंब इत्यादी पिकांची लागवड केल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. पारंपरिक शेतीत बदल करून फळबागांकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने परिवर्तनाची फार मोठी नांदी दिसून येते.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या सादोळा येथील शेतकरी राहुल अरुण इंगळे आणि काशीनाथ नवनाथ इंगळे या शेतकऱ्यांची यशोगाथा अशीच आहे. हे शेतकरी ग्लोबल विकास ट्रस्टच्या संपर्कात आले. त्यांना जलनायक मयंक गांधी करीत असलेल्या कामाची संपूर्ण माहिती मिळाली. या माहितीने प्रेरित होऊन त्यांनी फळबाग लागवड करण्याचा निश्चय केला. सिरसाळा येथील कृषीकुल मध्ये त्यांना केळी लागवड तंत्राचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले. ज्यामध्ये माती परीक्षण, लागवड, पाणी पद्धती, रोपांची सेंद्रिय पद्धतीने वाढ येथपासून ते काढणीपर्यंत त्यांना सर्व बाबी शिकवण्यात आल्या. पूर्वी ते सोयाबीन किंवा हरभरा या पिकांवर अवलंबून असायचे, मात्र पीक पद्धतीत बदल केल्यामुळे त्यांचे 20 हजारावरील उत्पन्न वाढून जवळपास 4 लाख 65 हजारांपर्यंत वाढले. विशेषतः कायम आर्थिक विवंचनेत असलेल्या इंगळे कुटुंबाची कौटुंबिक आणि आर्थिक स्थिती भक्कम झाली. मिळालेल्या पैशांतून ते आता मुलांना दर्जेदार शिक्षण देऊ शकत आहेत, बँकांचे घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करू शकत असल्याने ते आज प्रचंड समाधानी झाले आहे. जलनायक मयंक गांधी यांनी उभारलेल्या कृषिकुल मुळे आज आमच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला असल्याचेही ते सांगतात.
—-----------------------

_यशोगाथा  -1_

*नाव - राहुल अरुण इंगळे*

*गाव - सादोळा,  ता-केज, जिल्हा -बीड एकूण क्षेत्र (एकर)  - 1.15, पूर्वीचे पिक - सोयाबीन , प्रति एकर उत्पन्न - 30000, आत्ताचे उत्पन्न : 465000*

*ग्लोबल विकास ट्रस्ट सोबत जोडलेला अनुभव व  सहकार्य -*  माझे नाव राहुल अरुण इंगळे असून, मी केज तालुक्यातील सादोळा या गावाचा रहिवासी आहे. पूर्वी मी पारंपारिक पद्धतीने सोयाबीन हे पीक करत होतो. जसे पाहिजे तसे उत्पन्न मिळत नव्हते. नंतर मला ग्लोबल विकास ट्रस्ट या संस्थेची माहिती भेटली.  संस्था फळबाग लागवड करण्यास इच्छुक असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत करते.  नंतर मी ग्लोबल विकास ट्रस्ट या संस्थेकडे केळी लागवडीसाठी अर्ज केला आणि 1600 केळी रोपांची बुकिंग केली. मार्केटमध्ये ज्या रोपाची किंमत अठरा ते वीस रुपये पर्यंत आहे तेच रोप आम्हाला संस्थेकडून आठ रुपये दराने भेटले.  केळी रोप भेटल्यानंतर मी त्याची लागवड केली. संस्थेकडून मला वेळोवेळी मार्गदर्शन भेटत होते. संस्थेचे कर्मचारी वारंवार माझ्या केळी प्लॉटला भेट देत होते. ज्यामुळे मला खूप फायदा झाला. तसेच कृषीकुल ट्रेनिंग सेंटर सिरसाळा या ठिकाणी केळी लागवडीपासून ते काढण्यापर्यंत भरपूर गोष्टीत्यांनी शिकवल्या व यामुळे माझ्या ज्ञानात भर पडली. सांगायचं झालं तर ग्लोबल विकास ट्रस्टसोबत जोडून माझा फायदा झाला.

*ग्लोबल विकास ट्रस्ट संस्थे मुळे उत्पन्नात वाढ -*  खरं सांगायचं झालं तर ग्लोबल विकास ट्रस्ट  संस्थेमुळे माझे  वार्षिक उत्पन्न वाढले आहे. पूर्वी मी पारंपरिक सोयाबीन हे पीक करायचो, यामध्ये सर्व खर्च जाऊन मला 20 ते 25 हजार रुपये प्रति एकर राहायचे. मी ग्लोबल विकास ट्रस्ट या संस्थेकडून कमी दरातील केळी रोप घेतले मी एक एकर मध्ये 1600  केळी रोपांची लागवड केली होती त्या एक एकर मधून मला निव्वळ नफा -465000 रु इतका झाला. यामुळे मी खूप समाधानी आहे.

*मिळालेल्या उत्पन्नाचा विनीयोग वापर -* केळी लागवडीतून मिळालेल्या भरघोस उत्पन्नातून  माझ्या मुलांचा शिक्षणाचा खर्च. शिक्षणाचा भविष्याचा खर्च, तसेच दैनंदिन गरजा व बँकेकडून घेतलेले थोड्या कर्जाची आता परतफेड करता येणार आहे.

*इतर शेतकऱ्यांना संदेश -*  मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की माझे वार्षिक उत्पन्न वाढले तसे तुमचे पण नक्की वाढणार आहे. परंतु त्यासाठी पारंपारिक शेतीपेक्षा फळबागेकडे वळणे गरजेचे आहे. सोयाबीन, कापूस, हरभरा, यासारख्या पारंपारिक पिकांमधून पाहिजे तेवढे उत्पन्न भेटत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी फळबाग करणे गरजेचे आहे. फळबाग करत असताना ग्लोबल विकास ट्रस्ट सारख्या संस्थेकडून फळबाग  लागवड करा, जेणेकरून योग्य दिशा व योग्य मार्गदर्शन भेटेल आणि त्यामुळे फळबाग लागवड करत असताना तुमचा नक्कीच फायदा होईल.
—------------------------

_यशोगाथा  -2_

*नाव - काशिनाथ नवनाथ  इंगळे, गाव - सादोळा, ता -केज, जि- बीड*

*एकूण क्षेत्र (एकर)  - 2, पूर्वीचे पिक - सोयाबीन,  प्रति एकर उत्पन्न - 25000, आत्ताचे उत्पन्न - 500000*

*ग्लोबल विकास ट्रस्ट सोबत जोडलेला अनुभव व  सहकार्य -*  माझ नाव काशिनाथ नवनाथ इंगळे असून मी केज तालुक्यातील सादोळा या गावाचा रहिवासी आहे. ग्लोबल विकास ट्रस्ट सोबतचा अनुभव सांगायचं म्हणलं तर खूप छान होता.  पूर्वी मी पारंपारिक सोयाबीन, ज्वारी हे पीक करत होतो, पाणी भरपूर होते. एक विहीर होती, बोअरवेल होते तरी पण मी पारंपारिक पिके घेत होतो मात्र जसे पाहिजे तसे उत्पन्न मिळत नव्हते. एक दिवशी मला गावामध्ये ग्लोबल विकास ट्रस्टचे कर्मचारी मीटिंग घेण्यासाठी आले होते व तेंव्हा त्या मीटिंगमध्ये मी गेलो असता मला फळबाग लागवड  बद्दल समजले. नंतर मला ग्लोबल विकास ट्रस्ट या संस्थेची माहिती भेटली.  संस्था फळबागेवर काम करते असे समजले. नंतर मी ग्लोबल विकास ट्रस्ट या संस्थेकडे केळी लागवडीसाठी अर्ज केला. मी संस्थेकडे 3000  केळी रोपांची बुकिंग केली. मार्केटमध्ये ज्या रोपाची किंमत अठरा ते वीस रुपये पर्यंत आहे तेच रोप मला संस्थेकडून आठ रुपये या दराने भेटले.  केळी रोप भेटल्यानंतर मी ते लागवड केली. व संस्थेकडून मला वेळोवेळी मार्गदर्शन भेटत होते. संस्थेचे कर्मचारी वारंवार माझ्या केळी प्लॉटला भेट देत होते. ज्यामुळे मला खूप फायदा झाला.  तसेच आम्ही केळी लागवड केलेले सर्व शेतकऱ्यानं निवासी कृषीकुल ट्रेनिंग सेंटर सिरसाळा या ठिकाणी येथील तज्ञ प्रशिक्षक यांनी आम्हाला केळी लागवड बद्दल संपूर्ण मार्गदर्शन केले. तिथे राहण्याची सोय, चहा, नाष्टा, जेवनाची सोय एकदम छान प्रकारे केली होती. सांगायचं झालं तर मराठवाड्यात असे कृषीकुल ट्रेनिंग सेंटर कुठेच नाही. आदरणीय मयंक सरांनी कृषीकूल ट्रेनिंग सेंटर उभे करून शेतकऱ्यांसाठी फार मोठी उपलब्धी निर्माण केली आहे. सांगायचं झालं तर ग्लोबल विकास ट्रस्ट सोबत जोडून माझा फायदाच फायदा झाला.

*ग्लोबल विकास ट्रस्ट संस्थेमुळे उत्पन्नात वाढ -*  खरं सांगायचं झालं तर ग्लोबल विकास ट्रस्ट  संस्थेमुळे माझे  वार्षिक उत्पन्न वाढले आहे. पूर्वी मी पारंपरिक सोयाबीन, ज्वारी  हे पीक करायचो. यामध्ये सर्व खर्च जाऊन मला 22 ते 25 हजार रुपये प्रति एकर राहायचे. मी ग्लोबल विकास ट्रस्ट या संस्थेकडून कमी दरातील केळी रोप घेतले मी दोन एकर मध्ये 3000  केळी रोपांची   लागवड केली होती त्या एक एकर मधून मला निव्वळ नफा - 500000 रु इतका झाला. यामुळे मी खूप समाधानी आहे. उत्पन्नामध्ये फार मोठा बदल झाला आहे. पहिल्या उत्पन्नापेक्षा 15 ते 20 पटीने माझे उत्पन्न वाढले आहे.

*मिळालेल्या उत्पन्नाचा विनीयोग वापर -*  केळी लागवड करून मला जे उत्पन्न भेटले आहे त्या उत्पन्नाचा योग्य पद्धतीने वापर करत आहे. यामध्ये माझ्या घराचे काम, तसेच माझ्या मुलांचा शिक्षणाचा खर्च. शिक्षणाचा भविष्याचा खर्च, तसेच दैनंदिन गरजा, तसेच मुलीच्या नावावर बँक मध्ये पैसे ठेवणार आहे, जेणेकरून भविष्यात त्याचा वापर योग्य वेळी होईल.

*इतर शेतकऱ्यांना संदेश -*  मी मराठवाड्यातील सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सध्याची परिस्थिती पाहिली तर पारंपारिक पिकातून काही उत्पन्न मिळत नाही. आणि लागवडीपासून ते काढणीपर्यंतचा जर खर्च लिहून ठेवला तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला सोयाबीन व पारंपारिक पिकांमधून उत्पन्न भेटत नाही. तुम्हा सर्व शेतकऱ्यांना शेतामधून चांगले उत्पन्न घ्यायचे असेल तर फळबाग लागवड करणे गरजेचे आहे. मी ग्लोबल विकास ट्रस्ट अंतर्गत केळी लागवड करून चांगले उत्पन्न कमावले आहे. तुम्ही कोणतीही फळबाग करा परंतु फळबाग करत असताना योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन, खूप महत्त्वाचे ठरते. त्यासाठी ग्लोबल विकास ट्रस्ट अशा संस्थेकडून फळबाग लागवड करा व तुमचे वार्षिक उत्पन्न वाढवा. ग्लोबल विकास संस्था ही संस्था फक्त फळबागेसाठी रोपे देत नाही तर एकदम कमी किमतीमध्ये रोपे देऊन तुम्हाला मोफत मार्गदर्शन सुद्धा करते. अशा संस्थेमुळे फळबाग लागवड करत असताना तुमचा नक्कीच फायदा होणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने