विस्तार अधिकारी विलास डोंगरे यांची आत्महत्या

विस्तार अधिकारी विलास डोंगरे यांची आत्महत्या 


परळी प्रतिनिधी.   बीड पंचायत समितीमध्ये कार्यरत असणारे कृषी विस्तार अधिकारी विलास राजाराम डोंगरे यांनी परळी येथील शिवाजीनगर भागात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आंबेडकर चळवळीत व सामाजिक कार्यातही त्यांचे मोठे योगदान होते.
    विलास डोंगरे हे बीड येथील पंचायत समितीमध्ये कार्यरत होते. काल ते परळी येथील आपल्या जुन्या निवासस्थानी राहत असलेल्या पाहुण्यांना भेटण्यासाठी आले होते. आज सकाळी त्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. विलास डोंगरे हे सामाजिक कार्यातही अग्रेसर होते. तसेच त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 
   मृत्यू समयी त्यांचे वय 57 वर्षे होते. त्यांच्या पश्चात आई , एक भाऊ,पत्नी तीन मुली असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. डोंगरे परिवाराच्या दुःखात परळी बुलेटीन परिवार सहभागी आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने