शेख शाकेर अहमद यांच्या सह असंख्य तरुणांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश
परळी प्रतिनिधी. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी परळीतील मुस्लिम समाजाचे युवा नेते शेख शाकेर अहमद यांच्या सह इतर समाजातील तरुणांनी आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव
मिलिंद घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर पक्षप्रवेश केला. पक्ष प्रवेश करणा-या सर्वांचे मिलिंद घाडगे यांनी स्वागत केले.
वंचित बहुजन आघाडीच्या जिजामाता उद्यानातील पक्ष कार्यालयात संपन्न झालेल्या या जाहीर कार्यक्रमात डॉ.स्वप्नील महाळंगीकर,ता.अध्यक्ष गौतम साळवे, युवा ता.राजेश सरवदे, शहर उपाध्यक्ष धम्मानंद क्षीरसागर,ता . युवा महासचिव ज्ञानेश्वर गिते यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश घेण्यात आला.याप्रसंगी अकबर शेख,शेख मुजमील,शेख सलीम,सय्यद तुराब,सय्यद इम्तीयाल,सय्यद लायक,सागर कांबळे,अजय जाधव, विशाल अली शेख,ओम कराड, आदित्य व्हावळे,अरुण कराळे,अजय साबणे, अविनाश कराळे, वैभव लिंबुटकर,दिपक व्हावळे, केदार भातांगळे,विजय बुद्रे, रोहित पवार , कृष्णा देशमुख,अजय ठाकूर, प्रसाद कराड, समर्थ मुंडे, वैजनाथ कराळे, बिलाल कच्छी, विशाल ओगले, यांच्या सह असंख्य कार्यकत्यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला.
यावेळी वंचितचे सुभाष रोडे, बाळासाहेब कीरवले, भास्कर नावंदे,रवी मुंडे, आदेश पैठणे,सोनु वाघमारे, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा