तालुका स्तरीय खो खो स्पर्धेत पिंपरी जि.प.शाळेच्या मुलींनी पटकाविला तृतीय क्रमांक

तालुका स्तरीय खो खो स्पर्धेत पिंपरी जि.प.शाळेच्या मुलींनी पटकाविला तृतीय क्रमांक 


 परळी प्रतिनिधी.      नुकत्याच परळी वैजनाथ तालुका स्तरावर झालेल्या मुलींच्या खो खो स्पर्धेत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, पिंपरी बुद्रुक येथील मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
     परळी वैजनाथ येथे झालेल्या तालुकास्तरीय खो खो स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पिंपरी बु.येथील 14 वर्षाखालील मुलींच्या संघाने क्वार्टर फायनल जिंकत तालुक्यामध्ये तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल संघातील सर्व खेळाडू मुलींचे व त्यांचे मार्गदर्शक  गायकवाड सर, तसेच सर्व विजेत्या मुलींचे  यांचे खूप खूप अभिनंदन ग्रामपंचायत पिंपरी तथा शालेय व्यवस्थापन समिती पिंपरी व सर्व पालक यांच्या वतीने करण्यात आले.
    या यशाबाबत शाळेचे मुख्याध्यापक गणेश गिरी सर केंद्रप्रमुख संजय चिंते, शाळेतील शिक्षक शरद पवार सर, पठाण सर  श्री घोडके सर ,श्रीमती दासूद मॅडम, मस्के मॅडम, गीता मॅडम, शेटवाड मॅडम या सर्वांनी विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने