खामगाव-तपोवन शिवारातील रेल्वे उड्डाणपूल जागा मोजणी रद्द शेतकऱ्यांनी दाखवली एकजूट ; १९ सप्टेंबर रोजी प्रशासनाची शेतकऱ्यां सोबत बैठक होणार

खामगाव-तपोवन शिवारातील रेल्वे उड्डाणपूल जागा मोजणी रद्द 

शेतकऱ्यांनी दाखवली एकजूट  ; १९ सप्टेंबर रोजी प्रशासनाची शेतकऱ्यां सोबत बैठक होणार

 सिरसाळा  : परळी तालुक्यातील खामगाव- तपोवन येथील शेतकऱ्यांच्या मुळावर असलेल्या रेल्वे उड्डाणपूलाची काल दिनांक १२ सप्टेंबर रोजी होणारी मोजणी अखेर रद्द करण्यात आली आहे. या मुळे शेतकऱ्यांत खुप आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.  या विषयी सविस्तर वृत्त असे कि , नगर - बीड - परळी असा रेल्वे मार्ग परळी तालुक्यातील खामगाव  - तपोवन शिवरातून जातो आहे.  या ठिकाणी सुकळी गावचा मार्ग आहे , या मार्गावर उड्डाणपूल बनवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाचा आहे परंतु ह्या उड्डाणपूला मुळे खामगाव  - तपोवन येथील शेतकऱ्यांच्या जमिनी व त्यातील पाणी स्त्रोताचे  बोअर जात आहेत. प्रचंड नुकसान होणार म्हणून येथील शेतकरी खुप संतप्त होते.  काल दिनांक १२ सप्टेंबर रोजी  प्रशासन आपल्या लवाजम्या सह सदरील ठिकाणी जागा मोजमापास आले , पंरतु खामगाव  - तपोवन येथील शेतकऱ्यांनी एकजूट दाखवत ह्या मोजणीस विरोध केला.  विरोध का करत आहेत हे प्रत्यक्ष दर्शी शेतकऱ्यांकडून त्या ठिकाणी आलेले रेल्वे चे सुपरवायजर माणसिंग , महसुल उपविभागीय अधिकारी लाटकर ,यांना दाखवण्यात आले. परिस्थिती पाहून संबंधित अधिकाऱ्यांना देखील बाब पटली . वास्तविक परिस्थिती आणि एकजूटीचा विरोध या मुळे आलेल्या प्रशासनाने पंचनामा करत मोजणी रद्द केली.  शेतकऱ्यांशी चर्चा करुन दिनांक १९ सप्टेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.  शेतकऱ्यांसोबत बैठक झाल्या नंतर पुढील नियोजन ठरवले जाणार आहे. या ठिकाणी सिरसाळा पोलीस प्रशासनाचा पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता.  पिएसआय जाधव यांनी कसलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता.  


● या ठिकाणी पर्यायी मार्ग आहे , उड्डाणपूलाची गरज काय ? 
   :  सुकळी ( ता. धारुर  ) च्या ग्रामस्थांना पर्यायी मार्ग आहे.  त्या पर्यायी मार्गाचा उपयोग करता येईल,एकतर रेल्वे प्रशासनाचे उड्डाणपूल,शेतकऱ्यांना मावेज असा खर्च वाचणार आहे. विशेषत शेतकऱ्यांचे कसलेही नुकसान होणार नाही . कमी रकमेत सकळी गावच्या लोकांसाठी पर्यायी मार्ग मजबूत बनवता येणार आहे. पुर्वी सुकळी गावासाठी पर्यायी मार्गच प्रमुख मार्ग होता.  म्हणून उड्डाणपूलाची गरज नाही असे मत येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.


● हा उड्डाणपूल नियोजित नाही ? अधिकाऱ्यां कडे कागदपत्रेच नाहीत  : 
   रेल्वे प्रशासनाच्या वतीने सुपरवायजर माणसिंग नामक अधिकारी,महसुल प्रशासनाच्या वतीने परळी उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर व भूमिअभिलेख चे भूमापक मिसाळ आले होते.  या वेळी  रेल्वे उड्डाणपूला बाबत अधिकृत सॅक्शन कागदपत्रे दाखवा अशी विचारणा ग्रामस्थांनी अधिकाऱ्याकडे केली परंतु मोजणीस आलेल्या अधिकाऱ्यांकडे अधिकृत कसलेच कागदपत्रे नव्हती ,  एका कोऱ्या कागदावर पेनाने काही तरी वरच्या वर लिहून आणले होते. त्या मुळे हा उड्डाणपूल नियोजित नाही अशी शंका शेतकऱ्यांनी निर्माण झाली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने