दै. मराठवाडा साथी"चे संपादक सतिश बियाणी यांचे दुःखद निधनछत्रपती संभाजीनगर येथे उद्या अंत्यसंस्कार

दै. मराठवाडा साथी"चे संपादक सतिश बियाणी यांचे दुःखद निधन
छत्रपती संभाजीनगर येथे उद्या अंत्यसंस्कार
परळी / प्रतिनिधी-
      येथील दै.  मराठवाडा साथीचे संपादक सतिशमोहनलाल बियाणी यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 57 वर्षे होते. कै. सतिश बियाणी यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.
       दैनिक मराठवाडा साथीचे संपादक म्हणून सतिश बियाणी यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. परळी शहरातील अनेक पत्रकार घडवण्याचे काम त्यांच्या माध्यमातून झाले. स्व. मोहनलालजी  बियाणी यांनी सुरू केलेल्या दैनिक मराठवाडा साथीच्या भरभराटीमध्ये सतीश बियाणी यांचा मोलाचा वाटा होता. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी मराठवाडा साथीचे वटवृक्षात रूपांतर केले. धार्मिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यामध्ये ते सहभागी होत असत. मराठवाडा साथीच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरू होते. उपचार सुरू असतानाच संभाजीनगर येथील एका खाजगी दवाखान्यांमध्ये त्यांनी आज दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजण्याचे सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
    कै. सतीश बियाणी यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, पत्नी, मुलगी, मुलगा, भावजई, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. 

आज संभाजीनगर येथे अंत्यसंस्कार
      कै. सतिश बियाणी यांच्या पार्थिवावर उद्या शनिवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता  सिडको बसस्टॅण्डच्या पाठीमागे, हॉटेल ग्रँड कैलासच्या बाजूला, प्रविण मॅजिकच्या बाजूची गल्ली, श्री अंजनी कुरिअर्सच्या समोर सिडको, छत्रपती संभाजीनगर  येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने