परळी तालुक्यातील डाबी येथे महिलेची निघृण हत्या
घरगुती वादातून घटना घडल्याची चर्चा?
परळी प्रतिनिधी. परळी तालुक्यातील डाबी येथे 35 वर्षीय महिलेची निघृण हत्या झाली असून ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
डाबी टोकवाडी रस्त्यावर डाबी शिवारात असलेल्या एका आखाड्यावर राहणा-या शोभा तुकाराम मुंडे यांचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे.सदर महिलेची हत्या अत्यंत क्रूरपणे करण्यात आली आहे.घरगुती वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान महिलेचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी परळी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा