स्वच्छ भारत दिनानिमित्त वैद्यनाथ कॉलेजमध्ये स्वच्छता अभियान संपन्न
परळी वैजनाथ, ( प्रतिनिधी )
स्वच्छ भारत दिनानिमित्त स्वच्छोत्सव या SSCDA कार्यक्रमांतर्गत वैद्यनाथ कॉलेज, परळी वैजनाथ येथे दिनांक 25 सप्टेंबर रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन कॅप्टन गणेश चव्हाण (वैद्यनाथ कॉलेज परळी वै.) व ए.एन.ओ सय्यद शाकेर (जि.प.मा.शा.मुलांची , परळी वै.) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.या स्वच्छता मोहिमेत वैद्यनाथ कॉलेज, परळी वै.तथा जि.प.मा.शा.मुलांची , परळी वै. संस्थांतील एन सी सी कॅडेट्सनी उत्साहाने सहभाग नोंदविला. तसेच कॅडेट्सनी महाविद्यालय परिसराची स्वच्छता करून "एक दिन, एक घंटा, एक साथ" हा संदेश देणारे फलक महत्वाचे ठिकाणी लावून समाजात जनजागृती घडवून आणली.
सहभागी कॅडेट्सनी प्रात्यक्षिकातून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. या मोहिमेद्वारे महाविद्यालय व परिसरात स्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले. उपक्रमानंतर कॅडेट्सना अल्पोपहार देण्यात आला.
या उपक्रमाने शिस्त, प्रेरणा आणि स्वच्छतेबाबत जनजागृतीचा उत्तम संदेश समाजात पोहोचविला, असे आयोजकांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा