मिरवट जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बदली होऊन आलेल्या शिक्षकांचे स्वागत


मिरवट जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बदली होऊन आलेल्या शिक्षकांचे स्वागत 



परळी प्रतिनिधी.      तालुक्यातील मिरवट जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतेच शासन नियमानुसार बदली होऊन आलेल्या नवीन शिक्षकांचे शाळा तसेच गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
     या स्वागत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तुळशीराम पवार हे होते.तर  प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  मारुती जाधव, उपाध्यक्ष रतन तात्या इंगळे, गावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच प्रतीक्षाताई भंडारे, सामाजिक कार्यकर्ते माऊली इंगळे, रामभाऊ इंगळे, शाळेचे मुख्याध्यापक  विजयकुमार घुगे सर, सहशिक्षक तुकाराम हाडबे हे उपस्थित होते.
    यावेळी नवीन रुजू झालेले शिक्षक सर्वश्री नागरगोजे श्रीहरी,  मुजमिल सय्यद, श्रीमती राऊत मीरा, श्रीमती फड निर्मला, श्रीमती माळी मॅडम, श्रीमती कुबडे मॅडम, श्री शिंदे सर या  सर्वांचे गावाकरांच्या वतीने व शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.याप्रसंगी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने