राज्यमंत्री वित्त, नियोजन, कृषी,मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक --- भाई गौतम आगळे
परळी ( प्रतिनिधी ). मा.ना. राज्य मंत्री कामगार, वित्त व नियोजन, कृषी, मदत, विधी व न्याय यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती कामगार नेते भाई गौतम आगळे यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र राज्यातील वीज कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत राज्य मंत्री महोदयाचें समीती कक्ष ३१९ विस्तार मंत्रालय मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली कामगार विभागाने बैठकीचे आयोजन केले आहे. सदरील बैठकीस प्रधान सचिव, कामगार विभाग, प्रधान सचिव उर्जा, कामगार आयुक्त, व काॅमरेड नचिकेत मोरे सल्लागार स्वाभिमानी महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना अध्यक्ष वामन बुटले, उपाध्यक्ष भाई गौतम आगळे सर तथा रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव यांच्या सह कामगार प्रतिनिधी ची संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती एका प्रसिद्ध पत्रका द्वारे कामगार नेते भाई गौतम आगळे यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा