रेल्वे स्टेशन परिसरात लहान मुलीवर बलात्काराचा संतापजनक प्रकार – सर्वपक्षीयांकडून परळी शहर पोलीस ठाण्यात निवेदन
परळी : परळी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कारासारखी अमानुष घटना घडली असून, संपूर्ण शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेविरोधात सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिकांनी परळी शहर पोलीस स्टेशनला धाव घेऊन निवेदन सादर केले.
या निवेदनात संबंधित नराधमावर कठोरात कठोर कारवाई करून त्याला आदर्श शिक्षा द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. निर्दोष बालिकेवर झालेला हा पाशवी अत्याचार हा मानवीयतेलाच काळीमा फासणारा असून, अशा गुन्हेगारांना समाजात जागा नसल्याचे स्पष्ट शब्दांत सांगण्यात आले.
यावेळी उपस्थितांनी पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, न्यायालयीन प्रक्रियेत वेग आणून आरोपीस कठोर शासन व्हावे, अशी मागणी केली. शहरातील नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून पोलिसांनी सतर्कतेने काम करावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा