बालिका बलात्कार प्रकरणातील हैवानास पोलिसांनी घातल्या बेड्या,
आयपीएस र्ऋषीकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर पोलिसांची कारवाई
परळी प्रतिनिधी. काल परळी रेल्वे स्टेशन परिसरात एका पाच वर्षीय बालिकेवर बलात्कार करणाऱ्या हैवानास अवघ्या काही तासात पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. आरोपीस आज न्यायालयापुढे दाखल करण्यात येणार आहे.
काल दुपारी पंढरपूर येथून कामानिमित्त परळीत रेल्वेने आई वडीलासह एका पाच वर्षीय चिमुकली रेल्वे स्थानकात उतरली होती. त्यावेळी आजारी असलेले आईला झोप लागली आणि तिचे वडील थोडे बाहेर गेल्याचा फायदा घेऊन नराधमाने त्या मुलीला उचलून नेऊन जवळच परिसरात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. थोड्या वेळानंतर सदर घटना पीडित बालिकेच्या आई वडिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने याबाबत पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी सदर बालिकेवर परळी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी तिला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा चार्ज असणारे आयपीएस ऋषिकेश शिंदे यांनी परळीत येऊन घटनास्थळाची पाहणी केली. तसेच संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनाही आरोपी अटक करण्यासंदर्भात तातडीने योग्य त्या सूचना देऊन पथके तयार करण्यात आली. व आरोपीचा कसून शोध चालू केला.
दरम्यान रात्रीच पोलिसांनी या नराधमास अटक केली. आयपीएस ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या धडक कारवाईचे शहरातून स्वागत होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा