परळीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना
पाच वर्षाच्या बालिकेवर रेल्वे स्थानकात बलात्कार ?
रेल्वे स्टेशन परिसर बनला गुन्हेगारीचा अड्डा
परळी वैजनाथ( प्रतिनिधी)
परळी वैजनाथ येथे हैवानी दुष्कर्त्याने परिसीमा गाठली असुन माणुसकीला काळीमा फासणारी घटना आज दि. 31 रोजी सकाळच्या सुमारास रेल्वे स्थानकात थांबलेल्या एका पाच वर्षीय बालिकेला उचलून नेत तिच्यावर बलात्कार केल्याचा संतापजनक व माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे तातडीने घटनास्थळी पोहोचले.
याबाबत प्राप्त प्राथमिक माहिती अशी की, पंढरपूर येथील एक जोडपे आपल्या लहानग्या पाच वर्षीय मुलीला घेऊन कामाच्या शोधात परळीला रेल्वेने आले होते. ते रेल्वेस्थानकावर आले. या ठिकाणी हे पती-पत्नी आपल्या मुलीसह उतरले. यातील पीडित बालिकेची आई दोन-तीन दिवसापासून आजारी आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावरच थोडा वेळ आराम करून आपण बाहेर जाऊ असा विचार करून ती आपल्या मुलीला कुशीत घेऊन त्याच ठिकाणी झोपली. पिडित मुलीचे वडील स्थानकातच थोडेसे बाजूला गेलेले होते.दरम्यान तेवढ्या काही वेळात या मुलीच्या आईला झोप लागली व मुलगी तिच्या अवतीभवतीच चकरा मारत होती. याच दरम्यान एकटी मुलगी बघून अज्ञात हैवानी वृत्तीच्या व्यक्तीने तिला त्या ठिकाणाहून नेले व गैरकृत्य केले.
पाच वर्षीय बालिकेवर बलात्कार करून हा अज्ञात हैवान तिथून पसार झाला. ही मुलगी रडत तिच्या आईकडे आल्यानंतर तिच्या आईने काय झाले याचा शोध घेतला असता तिच्या गुप्तांगातून रक्तस्त्राव बघून तिच्यावर गैरप्रकार झाल्याचे तिच्या लक्षात आले. या पीडित बालिकेला परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
या बालिकेवर रेल्वे स्थानकातील दादऱ्याखाली नेउन कुणीतरी अज्ञात हैवान वृत्तीच्या व्यक्तीने माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.प्राथमिक वैद्यकीय तपासणीत गैरकृत्य झाल्याचे आढळले आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान परळी रेल्वे स्थानक परिसर हा गुन्हेगारांचा अड्डा बनण्याचे दिसून येत आहे मागच्या पंधरावड्यात हैदराबादहून मुंबईला जाणाऱ्या एका तरुणीला रेल्वे परिसरातून फूस लावून पळवून त्याच्यावर अत्याचार झाला होता. रेल्वे पोलीस आणि स्थानिक परळी पोलिसांनी अशा गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.

टिप्पणी पोस्ट करा