पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयाच्या प्रगतीत मुख्याध्यापक रोडे यांचे मोठे योगदान - कृष्णाभैया दळणर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयाच्या प्रगतीत मुख्याध्यापक रोडे यांचे मोठे योगदान - कृष्णाभैया दळणर 

गंगाखेड प्रतिनिधी.     राणी सावरगाव सारख्या ग्रामीण भागात सुरू करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीत मुख्याध्यापक किशन रोडे यांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन संस्थेचे सचिव कृष्णाभैया शिवाजीराव दळणर यांनी केले. ते शाळेचे मुख्याध्यापक किशन मारुती रोडे यांच्या सेवापूर्ती गौरव व कृतज्ञता सोहळा समारंभात उद्घाटक म्हणून बोलत होते. 
    राणीसावरगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयाचे मुख्याध्यापक किशन मारुती रोडे हे आपल्या 32 वर्षाच्या यशस्वी सेवा काळानंतर 30 ऑगस्ट रोजी सेवेतून सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सेवापूर्ती गौरव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध विधीज्ञ शिवाजीराव हाके हे होते. तर या कार्यक्रमाचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेचे सचिव कृष्णाभैया शिवाजीराव दळणर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून आदर्श शिक्षक तुळशीराम आचणे तसेच इंग्रजी विभाग प्रमुख व प्रसिद्ध लेखक प्रा. डॉ. तुकाराम बोबडे यांची उपस्थिती होती. सेवानिवृत्ती बद्दल संस्थेच्या वतीने तसेच उपस्थित मान्यवर व मित्र मंडळ , नातेवाईक, यांच्या वतीने मुख्याध्यापक किशन रोडे यांचा सपत्नीक भव्य असा सत्कार करण्यात आला. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते मुख्याध्यापक रोडे यांच्या जीवनावर आधारित परिचय पत्रकाचेही प्रकाशन करण्यात आले.
   प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे जेष्ठ संचालक रंगनाथ राठोड, एडवोकेट रामराव देवकते, राणी सावरगाव च्या सरपंच सौ बबीताताई जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर अंदोरीकर, सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश नानोर, संस्थेच्या संचालिका नरवटेताई,नव नियुक्त मुख्याध्यापक एल.आर.पोले आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पुढे बोलताना संस्थेचे सचिव कृष्णाभैया दळणर म्हणाले की, सेवा आणि आपल्या कामाशी असलेली प्रामाणिक निष्ठा हा मुख्याध्यापक रोडे यांच्यामध्ये असलेला विशेष असा गुण होता. शाळेच्या प्रगतीमध्ये आणि शाळेचा परिसरात नावलौकिक वाढविण्यात त्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडल्याचेही ते म्हणाले.
   याप्रसंगी एडवोकेट शिवाजीराव हाके, प्रमुख वक्ते तुळशीराम आचने, प्रा. डॉ. तुकाराम बोबडे, ज्येष्ठ पत्रकार व साहित्यक रानबा गायकवाड, शाळेचे माजी विद्यार्थी जगन्नाथ वाघमारे आदी मान्यवरांनी मुख्याध्यापक  किशन रोडे यांच्या कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यालयाच्या विद्यार्थिनी रोहिणी कदम, रूपाली हाके व सृष्टी व्हावरे यांनी मुख्याध्यापक रोडे यांच्या विषयी आलेल्या अनुभवाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. 
   कार्यक्रमास सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळकृष्ण उपाध्ये, नामदेवराव जाधव दादा, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे माजी मॅनेजर किशोर रेवणवार ( चाचा) ,केंद्रे सर, सदधम्म सेवा संघ माजलगावचे अध्यक्ष सदाशिव भालेराव, शिनगारे सर, रणदिवे सर,घनघाव सर,पत्रकार राहुल बनाटे ,माजी सरपंच दयानंद कुदमळे, गंगाखेड गट साधन केंद्राचे केंद्रे, परिसरातील मुख्याध्यापक पल्लेवाड, सुळे,केंद्रे,पिंपळे,ईमडे, राजमाता मा.आश्रम शाळेचे मुख्याध्यापक केंद्रे गटसाधन केंद्र माजी अकौंटट चंद्रकांत शितळे, अंबाजोगाई येथील राजेभाऊ बुरांडे यांच्यासह शिक्षक, शिक्षका, विद्यार्थी, पालक ,प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक डाल्पे यांनी केले. सूत्रसंचालन शिवशंकर डोईजड यांनी तर आभार धनंजय बने यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने