पोद्दार शाळेजवळील पर्यायी पूल पाण्याखाली परळी गंगाखेड रस्ता पहाटेपासून पूर्णपणे बंद

पोद्दार शाळेजवळील पर्यायी पूल पाण्याखाली परळी गंगाखेड रस्ता पहाटेपासून पूर्णपणे बंद 


परळी प्रतिनिधी.      परळी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या पाच वर्षापासून चालू आहे. या कामावरील पोद्दार लर्न शाळेजवळ घनशी नदीवर असणारा पूल रखडल्याने वाहतुकीस प्रचंड अडथळा निर्माण होत होता. आता कालपासून पावसाचा जोर वाढल्याने पर्यायी पूल पाण्याखाली गेला असून परळी आणि गंगाखेड कडील दोन्ही मार्गाने वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.
     पुलाचे काम वेळेवर न झाल्याने वाहतुकीस  फटका बसल्याचे दिसत आहे. तर पुलावरून पाणी जात असल्याने गंगाखेड कडून येणाऱ्या गाड्या तिकडेच गंगाखेड रस्त्यावर थांबलेल्या आहेत तर परळी कडून गंगाखेड जाणाऱ्या गाड्या पोद्दार शाळेचे अलीकडेच थांबलेल्या आहेत. पहाटे पाच वाजल्यापासून दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचे दिसत आहे. त्यातच पावसाची सततधार चालू आहे. त्यामुळे नागरिकांना मात्र प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. 
     आता तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या रखडलेल्या कामाकडे लक्ष देऊन वेगाने काम पूर्ण करून घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अन्यथा अशाच प्रकारे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने