शिक्षण मार्गचे शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर शिक्षक साहित्य संमेलनात होणार वितरण
परळी प्रतिनिधी. साप्ताहिक शिक्षण मार्गच्या वतीने दिले जाणारे शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले असून परळी येथे नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या 7 व्या मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये परळी गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील केंद्रप्रमुख भा.प.चेनलवाड, परळी येथील माध्यमिक आश्रमशाळा येथील चित्रकला शिक्षक गंगाधर क्षीरसागर, शिवछत्रपती विद्यालय,परळी येथील शिक्षक अशोक फड, माजलगाव सादोळा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख नवनाथ गोरख शिनगारे,मोहा तालुका परळी येथील महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व प्राचार्य मुरलीधर बोराडे, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा ( मुलांची) परळी येथील दत्तात्रय गंगाधर गायकवाड, सय्यद अब्दुल गणी जवाद अली, मुख्याध्यापक,मिल्लीया माध्यमिक शाळा,परळी वैजनाथ,विद्यावर्धिनी विद्यालयाच्या सहशिक्षिका सौ.सिंमींता शंकरराव सिरसाट(कांदे), जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा,बेलंबा येथील सहशिक्षिका सौ.कल्पना रामचंद्र मारमवार( कोम्मावार) यांचा शिक्षक गौरव पुरस्कारांमध्ये समावेश आहे.
नोव्हेंबरमध्ये परळी येथे 7 वे मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलन होणार आहे.या संमेलनात मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य संयोजक रानबा गायकवाड व संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा