हरित बीड अभियानांतर्गत परळी तालुक्यात सर्व विभागाकडून उत्साहात झाली वृक्ष लागवड
परळी प्रतिनिधी
हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र”या अभियानाच्या धर्तीवर बीड जिल्ह्यात हरित बीड हे अभियान राबविण्यात येत असून त्या अंतर्गत बीड जिल्ह्यात आज दिनांक ७ ऑगस्ट २०२५ या एकाच दिवशी 30 लक्ष वृक्ष लागवड करण्याचे नियोजन व संकल्प जिल्हाधिकारी विवेक जॉनसन यांनी मागील आठवड्यात केला . सदरील हरित बीड अभियान अंतर्गत परळी तालुक्यातील सर्व विभागांनी या वृक्ष लागवडीत हिरीरीने सक्रिय सहभाग नोंदविला असून या अभियानांतर्गत सकाळपासूनच वर्षी लागवड मोहिमेस सर्वत्र सुरुवात करण्यात आली.
प्रशासनाच्या वतीने महसूल ,नगरपरिषद, सामाजिक वनीकरण , वनीकरण तसेच ग्रामपंचायत विभाग यांनी एकत्रितपणे काही ठिकाणी वृक्ष लागवड कार्यक्रम राबविला .
हरित बीड अभियानांतर्गत औष्णिक विद्युत केंद्र येथील गट क्रमांक ०४ मध्ये सामाजिक वनीकरण व नगरपरिषद आणि महसूल व पोलीस प्रशासनाने सकाळी ८ वाजता वृक्षलागवड मोहिमेस शुभारंभ केला . या शुभारंभीय कार्यक्रमात विद्यावर्धिनी हायस्कूलचे विद्यार्थी यांनी विशेष सहभाग नोंदविला . या कार्यक्रमात सुरुवात राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने करण्यात आली. तसेच या शाळेतील कार्यक्रमात वृक्ष लागवड मोहीम अनुषंगाने प्रास्ताविक व मार्गदर्शन व्यंकटेश मुंडे तहसीलदार परळी यांनी केले .
त्यानंतर विद्यार्थ्यांची शाळेपासून वर्षे लागवडीच्या ठिकाणापर्यंत रोपासह रॅली घेण्यात आली . या रॅलीमध्ये अरविंद लाटकर , उप विभागीय अधिकारी परळी , तहसीलदार वेंकटेश मुंडे , पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे , सामाजिक वनीकरण विभागाचे अंगद भैरवाड, विद्या वर्धिनी शाळेचे मुख्याध्यापक राजेश्वर नीला, शाळेतील शिक्षक किरण कुलकर्णी स्वप्निल हंगे ,विजय मुंडे सुरेश कराड व संचालक संजय कराड, सुभाष भिंगोरे मधुकर मुंडे ,सामाजिक वनीकरण विभागाचे व नगरपरिषद विभागाचे वृक्ष लागवड मोहीमांचे पर्यवेक्षक सुनील आदोडे, विक्रम स्वामी, पंकज दहातोंडे व वैजनाथ दौंड हे हजर होते . या वृक्षलागवड मोहीम अंतर्गत तहसील कार्यालय परळी येथे देखील वृक्षलागवड करण्यात आली असून त्या ठिकाणी नायब तहसीलदार परविन पठाण , पंडित सुरवसे. राजेभाऊ ढगे , बालाजी कचरे , संतोष राठोड व इतर सर्व कर्मचारी यांनी लागवडीत सहभाग नोंदविला. हरित बीड अभियान अंतर्गत तालुक्यातील सर्व 90 ग्रामपंचायतीने सहभाग नोंदविला असून गट विकास अधिकारी संजय केंद्रे यांनी शिरसाळा ग्रामपंचायत येथे लागवड मोहीम कार्यक्रमात सहभाग नोंदविला .
आजच्या मोहिमेत तालुका कृषी अधिकारी तसेच पोलीस विभाग, महानिर्मिती वीज कंपनी यांनी देखील सहभाग नोंदविला . वन परिक्षेत्र विभाग परळी चया वतीने वसंत नगर व दौनापूर येथे वृक्ष लागवड करण्यात आली . वसंत नगर येथे वनविभागाच्या वृक्षलागवड कार्यक्रमात तहसीलदार वेंकटेश मुंडे , वनपरिक्षेत्राधिकारी मनोहर पुंड ,तलाठी विष्णू गीते , प्रतीक्षा बसापुरे ,ग्रामसेवक राजकुमार झगडे ,वनरक्षक मालेवार ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण राठोड यांनी सहभाग घेतला . परळी तालुक्यात हरित बीड अभियानांतर्गत वनविभाग 37000 , सामाजिक वनीकरण 57000 , पंचायत समिती 50000 , नगरपरिषद 22000 , महसूल पोलीस सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंधारण यांची ३६००० असे एकूण २ लक्ष वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आलेले असुन त्याची प्रत्यक्ष सुरुवात व अंमलबजावणी आजपासुन करण्यात आली . बीड हरित अभियानांतर्गत एक दिवसात तीस लक्ष लागवडीची नोंद क्यू आर कोड द्वारे करण्यात येत असून परळी तालुक्यातील सर्व विभागांनी लागवड केलेल्या रोपांची नोंद क्यु आर कोड द्वारे करण्यात आलेली आहे . हरित बीड अभियानद्वारे मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वृक्षलागवड मोहिमेमुळे बीड जिल्ह्यातील पर्यावरणीय वातावरणात चांगली सुधारणा होण्यासाठी निश्चीत हातभार लागणार असून या मोहिमेमुळे सर्वसामान्य नागरिक ,विद्यार्थी व एनजीओमध्ये जनजाग्रतीसह “एक पेड मॉ के नाम” हा सकारात्मक संदेश गेलेला असून या मोहिमेनंतर देखील मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड नागरिकांकडून होईल अशी अपेक्षा आहे . जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी एक दिवसात 30 लक्ष वृक्ष लागवडीसह हाती घेतलेल्या या मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे . या मोहिमेच्या दिवशी सायंकाळी काही भागात पावसाने चांगलीच हजेरी लावल्यामुळे आज करण्यात आलेली वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात यशस्वी होण्यात वरुन राजाचा देखील हातभार लागला आहे !!

टिप्पणी पोस्ट करा