निवडणूक आयोगावर राहूल गांधी यांनी केलेल्या आरोपांशी परळी काँग्रेस सहमत - बहादूर भाई

निवडणूक आयोगावर राहूल गांधी यांनी केलेल्या आरोपांशी परळी काँग्रेस सहमत - बहादूर भाई 

परळीतील मतदार याद्यांमध्येही गडबडीचा केला आरोप 


  परळी प्रतिनिधी कांग्रेस नेते राहूल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांशी परळी काँग्रेस सहमत असल्याचे सांगत 2019 पासून परळी विधानसभा मतदारसंघाच्या यादीतही मोठी गडबड असल्याचा आरोप परळी शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूर भाई यांनी आज दिनांक 12 ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांनी परळी विधानसभा मतदारसंघातील झालेल्या गडबडीचे काही व्हिडिओ चित्रण पत्रकारांना दाखविले.
     शहरातील नवीन व्हीआयपी रेस्ट हाऊस येथे बारा ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता शहर काँग्रेसच्या वतीने मतचोरी में हेराफेरी या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेचा काही भाग पत्रकारांना दाखविण्यात त्यानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुर भाई पत्रकारांशी बोलताना म्हणाले की,परळीतील निवडणुकीत सुध्दां राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांसारखी झाली आहे. निवडणुकांमध्ये राज्य शासनाच्या अधिन कर्मचारी निवडणूक काम करतात. ते स्थानिक खासदार, आमदार,यांचेच ऐकतात आणि तसेच त्यांना अपेक्षित आहे त्याप्रमाणे कामकाज करतात.मग निवडणूक यादी बनविणारे बीएल.ओ.प्रशासनाच्या अंतर्गत काम करत असतात.तो प्रामाणिक पणे काम करत नाही.सदर बीएलओ स्थानिक नेत्यांच्या हवाली फार्म देतात आणि भरुन घेतात.
    परळी शहरात प्रत्येक बुथवर 100 ते150 अतिरिक्त मते असल्याचे सांगताना एकूणच मतदार यादीतील घोळ याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले.साधारण दहा हजार मते बाहेरची जोडली गेली आहेत.भाजपा अनेक बाहेरील मतदारांचा वापर करते. आणि मतदानाच्या दिवशी या बाहेरील लोकांना परळीत आणले जाते.परळीतही असे अनेक बाहेरील मतदार दुपारी चार नंतर मतदान करतात.परळीत हे सर्व 2019 पासून सुरू आहे.
      मतदार यादी मध्ये घोळ करण्याचे हे काम सत्ताधारी पक्षाकडील नगरसेवक, निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले असे कार्यकर्ते हे काम करतात.मतदान कार्ड बाहेरील लोकांची बनवून घेतली जातात.मृत मतदारांचेही परळीत मतदान झाले निवडणूक आयोग 45 दिवसांत डाटा डिलिट का करत आहे.सीसीटिव्ही फुटेज का देत नाही.असा सवालही बहादूर भाई यांनी आज केला.परळीत मतदाराऐवजी दुसरेच कार्यकर्ते बटन दाबत होते. 
   प्रशासनही सत्ताधाऱ्यांना सहकार्य करते. विधानसभा निवडणुकीत फक्त 25 कॅमेरे चालू होते.बाकी बंद होते.निवडणूक अधिकारी यांना तक्रार केली परंतु काहीही फरक पडला नाही.आम्ही आतले नाही तर बाहेरचे कॅमेरे पाहतो. असे उत्तर अधिकाऱ्याकडून ऐकायला मिळाले त्यामुळे एकूणच निवडणुकीत कर्मचारी हा कोणाच्यातरी सांगण्यावरून काम करत होता हे दिसून आल्याचे ते म्हणाले.
    सध्या हा प्रश्न जनतेसमोर आल्यामुळे आम्ही परळीतील घडलेल्या प्रकाराची माहिती प्रकारांसमोर मांडत आहोत.निजामाबाद येथे नगर सेवक पदाची निवडणूक लढविणारा व्यक्ती याने परळीत मतदान केले.याचे आमच्याकडे पुरावे आहेत.परळीच्या मतदार यादीतही प्रशासनाच्या मदतीने घोळ केला जात आहे. डबल नावे टाकली जातात , हैदराबाद येथे मागील वीस वर्षांपासून राहणा-या व्यक्तीची परळीत नावे आहेत. ही सर्व नावे प्रशासनाने वगळावेत व अद्यावत कोणतेही गडबड नसलेले आणि घोटाळा नसलेल्या याद्या निवडणूक आयोगाने आगामी काळात प्रसिद्ध कराव्यात असे आवाहनही बहादुर भाई यांनी केले. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रकाश देशमुख, गुलाब देवकर, रणजीत देशमुख, एत्तेशाम,सिरसाट आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने