अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात महिला रुग्णांची हेळसांड, सुविधांचा अभाव
अंबाजोगाई प्रतिनिधी. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणाऱ्या महिला रुग्णांची हेळसांड होत असून आरोग्य मंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात बाहेरगावाहून महिला रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात.यामध्ये डिलिव्हरीसाठी मोठ्या संख्येने महिला येत असतात.डिलिव्हरी झाल्यानंतर बी, इमारतीतील सर्जिकल विभागातील दाखल केलेल्या महिलांना आवश्यक सुविधा दिल्या जात नसल्याची तक्रार नातेवाईकांकडून होत आहे.
महिला रुग्णांना लागणा-या वस्तुंची ड्युटीवर असणा-या स्टाफ आणि डॉक्टरांना मागणी करूनही दिल्या जात नाहीत.राज्य सरकार आरोग्य सेवेवर करोडो रुपये खर्च करीत आहे.मात्र त्याचा रुग्णांना फायदा होत नसेल तर हा पैसा व साहित्य जाते कुठे याची चौकशी होण्याची गरज आहे.

टिप्पणी पोस्ट करा